Share

भाजप हा शिवसेनेलाही संपवणार : जयंत पाटलांचा आरोप

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभेच्या भरघोस यशाने सर्वत्र मोदीमय राजकीय वातावरण झाले आहे. लोकसभेच्या भरघोस यशाने आता विधानसभा निवडणुकीच्या मोर्चेबांधणीलाही जोशाने सुरुवात झाली आहे. सगळ्याच पक्षांकडून प्रत्येक मतदारसंघासाठी उमेदवाराची चाचपणी सुरु आहे.

याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शिवसेनाला सूचक इशारा दिला आहे. जयंत पाटील म्हणाले की, मित्र पक्ष आपल्याच संपवायचा प्रयत्न करतोय हे लवकरच शिवसेनेच्या लक्षात येईल, असे वक्तव्य पाटलांनी केले आहे.

तसेच जयंत पाटील पुढे बोलताना म्हणाले की, सर्व मार्गांचा अवलंब करून कोणत्याही परिस्थितीत सत्ता टिकविणारा भ्रष्ट राजकीय पक्ष म्हणून भाजप ओळखला जाईल, असा घणाघाती आरोप भाजप सरकारवर पाटलांनी केला आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीत आघाडीला लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. मात्र लोकसभेचा पराभवाला विसरून विधानसभेसाठी आघाडीने जोमाने सुरुवात केली आहे. मात्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आघाडीला गळती लागली आहे. अनेक नेते मंडळींनी पक्षाला राम राम ठोकत भाजप-सेने सोबत जात आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!