टीम महाराष्ट्र देशा – औरंगाबाद विमानतळाला छत्रपती संभाजी महाराज याचं नाव द्यावं असा ठराव काल महाविकास आघाडीच्या सरकारने विधानसभेत मांडला. हा ठराव एकमताने मजूर झाला असं विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी घोषित केले . आता हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात येणार आहे.
परंतू या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात तू तू -मै मै बघायला मिळाली. राज्याच्या अर्थसंकाल्पावरील चर्चेत समाधानकारक उत्तर मिळत नसल्याचा आरोप करत विरोधी पक्ष भाजपच्या आमदारांनी सभात्याग केला. या नंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नामांतराचा प्रस्थाव सभागृहात ठेवला. जो एकमताने मंजूर झाला.
यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि जल संपदा मंत्री जयंत पाटील यांनी भाजपवर टीका केली. सदर ठराव मांडणार असल्याची माहिती विरोधी पक्षाला असूनही ठरावाच्या वेळी भाजप उपस्थित नाही हे छत्रपती संभाजी महाराजांबद्दल त्यांना किती आदर आहे हे दर्शवत आहे असे म्हणाले.
यावर भाजपकडून आशिष शेलार यांनी उत्तर देताना महाविकास आघाडीवर टीका केली. केंद्रातील भाजप सरकारच विमानतळाला छत्रपती संभाजी महाराजांचं नाव देणार आहे असं त्यांनी स्पष्ट केलं. तसेच तुमचं संभाजी महाराजांवरील प्रेम बेगडी आहे कारण तसं नसतं तर तुम्ही औरंगाबाद शहराचं नाव संभाजीनगर करायचा प्रस्ताव आणला असता. असे शेलार म्हणाले.
हेही पहा –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

