मुंबई : अभिनेत्री श्रीदेवी यांच्या मृत्युला आज तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. 24 फेब्रुवारी 2018 रोजी श्रीदेवींच्या निधनाची बातमी आली आणि सगळ्यांनाच शोकसागरात लोटून गेली. आजही श्रीदेवींच्या आठवणीने चाहते भावूक होतात. कुटुंबाचे म्हणाल तर अद्यापही बोनी कपूर, जान्हवी, खूशी या धक्क्यातून सावरलेले नाहीत. आज श्रीदेवींच्या स्मृतीदिनी जान्हवी कपूरने एक भावूक पोस्ट शेअर केली आहे.
श्रीदेवींनी आपल्या हातांनी लिहिलेली नोट जान्हवीने शेअर केली आहे. या नोटमध्ये श्रीदेवींनी लेकीवर प्रेमाचा वर्षाव केला होता. ही नोट शेअर करत, जान्हवी आईला मिस करत असल्याचे लिहिले आहे. ‘आय लव्ह यू माझ्या लब्बू… तू या जगातील सर्वात चांगली मुलगी आहेस,’ असे श्रीदेवींनी या नोटमध्ये लिहिले होते. श्रीदेवींच्या तिस-या पुण्यतिथीनिमित्त आज जान्हवी कपूर, खुशी कपूर व बोनी कपूर यांच्या चेन्नईतील घरी पूजेचे आायोजन करण्यात आले आहे.
आईच्या आठवणीने श्रीदेवींची लहान लेक खुशी कपूरही भावूक झाली. श्रीदेवी व बोनी कपूर यांचा एक जुना फोटो शेअर करत आय लव्ह यू…., असे लिहित तिने पोस्ट शेअर केली आहे.
https://www.instagram.com/p/CLqdVKllCAa/?utm_source=ig_web_copy_link
महत्त्वाच्या बातम्या
- ‘संजय राठोड यांनी ओंगळवाणं शक्तिप्रदर्शन करून मुख्यमंत्र्यांचा अपमान केलाय’
- भाजप राजकीय प्रदुषणाचा बळी पडत आहे; वरिष्ठ नेत्याचा घरचा आहेर
- जगातील सर्वात मोठे स्टेडियम आता नरेंद्र मोदींच्या नावाने ओळखले जाणार
- ‘तुमचेच दात आणि तुमचेच ओठ… पवार साहेब फक्त नाराज होणार पण कारवाई नाही होऊ देणार’
- ‘विराट कोहली कोणतं काम करु शकत नाही?’, ICC ने शेअर केला व्हिडीओ


