Share

लढा! ‘कोरोना’ व्हायरसविरोधात : घरी बसून करा ‘हे’ काम, रामदेव बाबांचा ‘भन्नाट’ सल्ला…

Published On: 

मुंबई : करोना विषाणूच्या संकटावर मात करण्यासाठी आज सकाळी सात वाजेपासून रात्री नऊ वाजेपर्यंत देशात जनता कर्फ्यू पाळण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील नागरिकांना आत एक दिवस जनता कर्फ्यू पाळण्याचं आवाहन केलं आहे.

‘जनता कर्फ्यू’च्या पार्श्वभूमीवर आज दिवसभर अन्नधान्य, दूध, औषधे यांसारख्या अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकानं आणि कार्यालयांना टाळं असणार आहे. तसेच, कुणीही घराबाहेर पडू नये असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून करण्यात आलं आहे.

याच पार्श्वभूमीवर रविवारी देशभरात सकाळी ७ वाजल्यापासूल जनता कर्फ्यू पाळण्यास सुरूवात झाली आहे. हा कर्फ्यू रात्री ९ वाजेपर्यंत असेल. या काळात तुम्ही काय करू शकता, याचा सल्ला योगगुरू रामदेव बाबांनी दिला आहे.

रामदेव बाबा यांनी एक टि्वट केलं आहे. त्यांनी म्हटलंय की, पंतप्रधान नरेंद्र यांचा संकल्प आपण सारे पूर्ण करून दाखवूया. भारताला करोनापासून वाचवूया. सर्वांनी घरी स्वाध्याय करा. योग करा. काही आसनं करा. प्राणायाम आणि ध्यानधारणा करा. याशिवाय घरी बसून सत्संगही करा. पण, बाहेर येऊ नका. घरातच राहा.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!