Share

काश्मीरमध्ये सुरक्षा रक्षकांना मोठे यश, नावाकदल परिसरात दोन दहशतवाद्यांचा खात्मा

Published On: 

नवी दिल्ली : काश्मीर खोऱ्यात सुरक्षा रक्षकांना मोठे यश आले आहे. दहशतवाद्यांच्या मोठ्या कटाला उधळून लावण्यात आले असून दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. जम्मू कश्मीर पोलिस आणि केंद्रीय राखीव दलाच्या पोलिसांनी ही जोरदार कारवाई केली आहे. तर या कारवाईमध्ये जवानांनी मोठा हत्यारे आणि शस्त्र साठा जप्त केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, श्रीनगरमधील नावाकदल परिसरात सोमवारी रात्री सुरक्षा दल, काश्मीर पोलीस आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु झाली होती. या चकमकीत एक पोलीस जवान जखमी झाला आहे. सकाळी पुन्हा सर्च ऑपरेशनवेळी दहशतवाद्यांकडून गोळीबार करण्यात आला. या चकमकीला भारतीय सैन्याकडून चोख प्रत्युत्तर दिले जात आहे. या चकमकीमुळे संपूर्ण राज्यातील इंटरनेटसेवा पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. दरम्यान, आजच्या कारवाईच्यावेळी दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात आले.

दहशतवाद्यांनी प्रथम सुरक्षा दलावर गोळीबार केला. त्यानंतर भारतीय सैन्याने दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर देणे सुरू केले. हे दोन्ही दहशतवादी निवासी भागात लपले होते. यानंतर सुरक्षा दलाने सर्व बाजूंनी परिसर घेरला आणि त्या परिसरातील मोबाईल आणि इंटरनेट सेवा बंद केली. यानंतर आता सैन्याने दोन्ही दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे.

महत्वाच्या बातम्या

राज्य सरकारला जाग येण्यासाठी भाजप पक्षाने पुकारले ‘महाराष्ट्र बचाव’ आंदोलन

शरद पवारांनी पंतप्रधानांप्रमाणे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाही पत्र लिहावे, फडणविसांनी हाणला टोला

#लढा_कोरोनाचा : बाबा आमटेंची नात उतरली कोरोनाच्या युद्धात

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!