कानपूर : भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ ) यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना गुरुवारपासून (25 नोव्हेंबर) कानपूर येथे खेळवला जात आहे. पहिल्या कसोटी सामन्यात निराशाजनक अंपायरिंग पाहायला मिळाली. आतापर्यंत या सामन्यात पंचांनी दिलेले 6 निर्णय चुकीचे ठरले आहेत. या निर्णयांमुळे सामन्याचा मार्ग कोणत्याही प्रकारे बदलू शकला असता. न्यूझीलंडचा सलामीवीर टॉम लॅथमने डीआरएसमुळे तीनदा बाद होण्याचे टाळले.
कानपूर कसोटीच्या दुसऱ्या दिवशी लॅथम ५० धावांवर नाबाद राहिला. त्याने 164 चेंडूत 4 चौकारांच्या मदतीने ही धावसंख्या उभारली. याशिवाय दुसरा सलामीवीर विल यंगने 180 चेंडूत 75 धावा केल्या. यष्टीपर्यंत न्यूझीलंडची धावसंख्या १२९/० होती. न्यूझीलंड अजूनही भारतापेक्षा 216 धावांनी मागे आहे.
इंग्लंडविरुद्धच्या भारताच्या घरच्या मालिकेदरम्यान सामनाचे पंच नितीन मेनन आणि अनिल चौधरी यांनी केलेल्या पंचांचे कौतुक करण्यात आले. पण या जोडीने पहिल्या दोन दिवसांत निराशाजनक पंचगिरीचे प्रदर्शन केले. दिवसअखेर भारताला वाटले की त्यांनी पहिली विकेट घेतली. पण रिप्लेमध्ये, तो नर्णय भारताच्या बाजूने लागला नाही. या सामन्यात पंचांनी घेतलेल्या निर्णयावर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.
If Tommy Latham gets a ton here India might go back to refusing to use DRS at home ????
— Jimmy Neesham (@JimmyNeesh) November 26, 2021
दरम्यान, न्यूझीलंडचा ऑल राऊंडर जेम्स नीशम (James Neesham) यानं देखील अंपायरिंगवर टोला लगावला आहे. लॅथमनं आता शतक झळकावलं तर टीम इंडिया त्यांच्या देशात DRS चा वापर करण्यास नकार देऊ शकतं, असं ट्विट करत त्यानं टोला लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या:
- मलिकांच्या घराभोवती संशयास्पद लोकांचा वावर? फोटो ट्वीट करत म्हणाले,’या गाडीत बसलेले…’
- प्रभू वैद्यनाथ मंदिराची एक विट सुद्धा इकडची तिकडे होणार नाही- धनंजय मुंडे
- अशा प्रसंगी परमेश्वर व सरकार तरी काय करणार?- संजय राऊत
- ‘…याला उशिरा सुचलेले शहाणपण म्हणतात’, भाजपवर राऊतांची टोलेबाजी
- महाराष्ट्राची सत्ता हातात घेण्यासाठी राज्य पेटवायचा डाव- यशोमती ठाकूर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

