🕒 1 min read
जळगाव: उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्हा बँकेच्या १० जागांची मतमोजणी सुरू आहे. राजकीय दृष्ट्या जळगाव जिल्हा बँक महत्वाची मानली जाते. राज्यभरात सर्वत्र निवडणुकांचे वातावरण सुरू आहे. सर्वच पक्ष आपापल्या परीने मोर्चेबांधणी करत आहेत. विरोधी पक्ष महाविकास आघाडी सरकारवर टीका करत आंदोलन करत अनेक प्रकारे मागे खेचण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. मात्र जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी सरकारनेच बाजी मारल्याचे दिसत आहे.
जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत महाविकास आघाडीनं भाजपला चांगलाच धक्का दिला आहे. २१ जागांपैकी ११ जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस निवडून आले आहे, ७ जागांवर शिवसेना निवडून आले तर २ जागांवर काँग्रेस निवडून आले आहे. भाजपला मात्र एका जागेवरच समाधान मानावे लागले आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांचा देखील एकतर्फी विजय झाला आहे.
जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीत अॅड. रोहिणी खडसेंचा विजय झाला आहे. ओबीसी महिला राखीव मतदारसंघातून रोहिणी खडसे यांनी एकतर्फी विजय मिळवला आहे. हा विजय म्हणजे गेल्या ६ वर्षांत केलेल्या कामाची पावती असल्याची प्रतिक्रिया रोहिणी खडसेंनी व्यक्त केली आहे. यापुढंही जिल्हा बँक आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या:
- यशोमती ठाकूर म्हणाल्या, देवेंद्र फडणवीस जबाबदार नेते आहेत, पण….
- मराठी चित्रपटाचं कौतुकास्पद पाऊल! देशाच्या समस्त शेतकऱ्यांना ‘अजिंक्य’ होणार समर्पित
- एसटी संपाबाबत तोडगा निघण्याची शक्यता; परिवहन मंत्र्यांची ‘पॉवर फुल’ बैठक
- …तोपर्यंत त्यांना पोलिस दलात घेऊ नका; किरीट सोमय्या यांचा विश्वास नांगरे पटलांवर गंभीर आरोप
- हे सरकार बेवड्यांना समर्पित सरकार आहे- सुधीर मुनगंटीवार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
