नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर फिरकीपटूंच्या निवडीवर माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रा (Aakash Chopra) ने मोठी प्रतिक्रिया दिली आहे. अश्विन (Ashwin)आणि जडेजामध्ये (Ravindra Jadeja) एक स्पिनर निवडायचा असेल तर कोणाला संधी मिळेल. यावर आकाश चोप्राने भाष्य केल आहे. आकाश चोप्राच्या मते, अश्विनपेक्षा जडेजाला प्राधान्य दिले जाऊ शकते कारण त्याच्या खेळामुळे संघाचा समतोल राखला जातो. अश्विन खरोखरच प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान घेण्यास पात्र असला तरी जडेजा त्याच्या पुढे जाऊ शकतो.
रविचंद्रन अश्विनने अलीकडेच न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत जबरदस्त कामगिरी केली आणि त्याला मालिकावीर म्हणून गौरवण्यात आले. मात्र, परदेश दौऱ्यांवर भारतीय संघ एकच फिरकीपटू घेऊन जातो आणि अशा स्थितीत अश्विन आणि जडेजा यांच्यात कोणाला वगळले जाणार हा प्रश्नच आहे.
आकाश चोप्राने त्याच्या यूट्यूब चॅनलवर अश्विन आणि जडेजा यांच्यावर प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला, हा खूप कठीण निर्णय आहे. माझ्या मते अश्विनने खेळावे पण कदाचित जडेजाला संधी मिळेल. अश्विनपेक्षा जडेजा जास्त विकेट घेईल असे नाही, पण संघाचा समतोल राखण्यासाठी त्याला संधी दिली जाऊ शकते. जर तुम्ही पाच फलंदाजांसह गेलात आणि ऋषभ पंत सहाव्या क्रमांकावर खेळत असेल, तर सातव्या क्रमांकावर तुम्हाला फलंदाजी करू शकणारा गोलंदाज लागेल. या क्रमांकावर कोण चांगली फलंदाजी करू शकतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.
महत्वाच्या बातम्या
- ‘उध्दव ठाकरेंचे शेतकरी प्रेम पुतणा मावशीचे; प्रविण दरेकरांची मुख्यमंत्र्यावर टीका
- ‘राज्याला लुटण्याचा अधिकार हा फक्त मविआ मंत्र्यांना दिला आहे’
- माझ्या जिल्ह्याची ‘ही’ ओळख पुसून काढायची आहे – विजय वडेट्टीवार
- एजाज पटेलने आयपीएलमध्ये खेळण्याबाबत केले मोठे वक्तव्य
- ‘आम्हाला वाटत होते हिंदुहृदयसम्राट राऊतांचे गुरू पण…’

