नवी मुंबई : भाजपने महापालिका निवडणुकांची तयारी सुरु केली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील भाजपा पदाधिकारी, कार्यकर्त्यांचं राज्यव्यापी अधिवेशन आयोजित करण्यात आलं आहे. भाजपचं हे अधिवेशन 15 आणि 16 फेब्रुवारीला नवी मुंबईत घेण्यात येत आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा अधिवेशनाचे उद्घाटन करतील.
तसेच सकाळी 11.30 वाजता राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्याहस्ते ध्वजारोहन होईल आणि अधिवेशनाल सुरुवात होईल. दुपारी 2 वाजता या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. या राज्यव्यापी अधिवेशनाला महाराष्ट्रातील भाजपचे खासदार, आमदार, महापौर, नगरसेवक सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेचे पदाधिकारी सहभागी होणार आहेत. चंद्रकांत पाटील आजच भाजप प्रदेशाध्यक्ष पदाचा कारभार स्वीकारतील.
विरोधी पक्ष नेता देवेंद्र फडणवीस या अधिवेशनाचा समारोप करतील. भाजपा राष्ट्रीय सहसंघटनमंत्री व्ही. सतीश, केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर, रेल्वेमंत्री पीयूष गोयल, केंद्रीय राज्यमंत्री व माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब पाटील दानवे, माजी अर्थमंत्री व माजी प्रदेशाध्यक्ष सुधीरभाऊ मुनगंटीवार, माजी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे, प्रदेश संघटनमंत्री विजयराव पुराणिक यांच्यासह पक्षाचे विविध नेते या अधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत.
दरम्यान, या अधिवेशनात दोन प्रस्ताव पास होणार आहेत. या सरकारच्या 80 दिवसांच्या कामकाजाचा पंचनामा करण्यात येणार आहे. महाविकास आघाडी सरकारने कशाप्रकारे जनतेची फसवणूक केली, याची माहिती लोकांपर्यंत पोहोचवली जाणार आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
