टीम महाराष्ट्र देशा : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्षपदी सोमवारी अपेक्षेप्रमाणे जे.पी. नड्डा यांची वर्णी लागली. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून जगत प्रकाश नड्डा यांची आज बिनविरोध निवड करण्यात आली. भाजपाच्या राष्ट्रीय निवडणूक समितीचे प्रमुख राधामोहन सिंग यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली.
जे. पी. नड्डा यांच नाव आधीपासूनच जवळपास निश्चित झालं होतं. त्यांच्या नावाची केवळ औपचारिक घोषणा बाकी राहिली होती. यापूर्वी अमित शहा हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. शहा यांच्या धोरणामुळे भाजपला अनेक राज्यांमध्ये यश मिळाले होते. मात्र, लोकसभा निवडणुकीनंतर शहा यांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्याने हे पद रिक्त झाले होते.
दरम्यान, जेपी. नड्डा यांचं नाव सध्या नव्या राष्ट्रीय अध्यक्षाच्या शर्यतीमध्ये पुढे होते. ते आरएसएस म्हणजेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विश्वसनीय चेहरा म्हणून ओळखले जातात. जे.पी नड्डा यांनी मोदी सरकारच्या कार्यकाळामध्ये केंद्रीय आरोग्यमंत्री म्हणून काम केले आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
