Share

…तरीही पराभवाला सामोरे जावे लागले हेच माझ्यासाठी धक्कादायक : पॉंटिंग

Published On: 

🕒 1 min read

ब्रिस्बेन : ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथा आणि शेवटचा सामना द गॅबा स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात भारताने ३ विके्टसने विजय मिळवत इतिहास रचला आहे. या विजयासह भारताने २-१ ही मालिका जिंकली आहे. भारताचा हा ऑस्ट्रेलियन भूमीतील सलग दुसरा मालिका विजय आहे. याचबरोबर गेल्या ३३ वर्षांचा ऑस्ट्रेलियाचा ब्रिस्बेन कसोटीत अपराजित राहण्याचा विक्रमही भारताने खंडीत केला आहे.

अजिंक्‍य रहाणेच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने कसोटी मालिकेत सरस कामगिरी करत यजमान ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. मात्र, संघाच्या पराभवावर विश्‍वास बसत नाही, अशा शब्दांत ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉंटिंग याने आपल्या भावना व्यक्‍त केल्या.

विजयासाठी आवश्‍यक 328 धावांचे लक्ष्य गाठून भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध चौथ्या क्रिकेट कसोटीमध्ये तीन गडी राखून विजय नोंदवला. भारतीय संघात नवोदित खेळाडूंची संख्या जास्त असूनही त्यांनी अफलातून कामगिरी केली. मात्र, यजमान संघालाही वर्चस्व राखण्याची संधी होती ती त्यांनी गमावली. त्यामुळेच ही मालिका गमवावी लागली. असे असले तरीही हा पराभव अद्याप पचनी पडलेला नाही, असेही पॉंटिंग म्हणाला.

प्रमुख खेळाडूंसह संपूर्ण मालिका खेळूनही ऑस्ट्रेलियाला पराभव पत्करावा लागला. त्यावर अद्याप विश्वासच बसत नाही. प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत भारताचा संघ प्रमुख संघ नव्हता तर अ संघाइतकीच त्यांची ओळख होती. तरीही त्यांना मालिका जिंकली. त्यामुळे भारतीय संघाचं कौतुक करावे तितके कमीच आहे. एकामागून एक येणाऱ्या आव्हानांना समर्थपणे सामोरे जात त्यांनी ही मालिका जिंकली.

गेल्या पाच-सहा आठवड्यात भारतीय संघ कठीण प्रसंगातून गेला आहे. कर्णधार विराट कोहली मायदेशी परतला होता. त्यातच प्रमुख खेळाडूंना दुखापती झाल्यामुळे भारताला नवख्या खेळाडूंना घेऊन मैदानात उतरावे लागले. ऑस्ट्रेलिया तर आपल्या संपूर्ण ताकदीने उतरला होता. तरीही पराभवाला सामोरे जावे लागले हेच माझ्यासाठी धक्कादायक आहे, असेही त्याने सांगितले.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!