Share

‘आई होती म्हणून आज मी इथे आहे’ शपथविधीनंतर कमला हॅरिस यांची भावूक पोस्ट !

Published On: 

🕒 1 min read

वाशिंग्टन : जगातील सर्वात जुन्या लोकशाही राष्ट्रातील पहिल्या महिला उपराष्ट्रपती मूळच्या भारतीय वंशाच्या असलेल्या कमला हॅरीस यांनी अमेरिकेच्या ४९ उपराष्ट्रपती म्हणून शपथ घेतली. अमेरिकेच्या उपराष्ट्रपती बनणाऱ्या त्या पहिल्या महिला कृष्णवर्णीय देखील आहेत.

हॅरिस यांच्या आई भारतातील तामिळनाडूतील गावातील होत्या. या पार्श्वभूमीवर काल कमला हॅरीस यांनी उपराष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेतल्यानंतर त्यांच्या या तामिळनाडूतील गावामध्ये उत्सव साजरा करण्यात आला यावेळी गावातील मंदिरांमध्ये विशेष पूजेचे आयोजन करण्यात आलं होतं. तर ग्रामस्थांनी हॅरिस त्यांच्यासाठी प्रार्थना केली.

कमला यांच्या आई भारतीय तर वडील जमैका येथील होते. त्यांच्या आई तामिळनाडू राज्यातील तिरुवरुरच्या थेलूशेंद्रापुरम या गावातील होत्या. शामला गोपालन असे त्यांचे नाव. त्या वयाच्या एकोणिसाव्या वर्षी अमेरिकेत स्थायिक झाल्या होत्या. तर 55 वर्षीय कमला हॅरीस यांचा जन्म कॅलिफोर्निया येथील ऑक्लंड येथे झाला.

यावेळी या यशानंतर कमला हॅरीस यांनी ट्विटरवरून एक भावुक पोस्ट शेअर करत आपल्या आईच्या आठवणींना उजाळा दिला आहे. ‘मी आज येथे आहे ती माझ्या आईमुळेच असं म्हणत त्यांनी ट्विट केला आहे.’

काल कमला हॅरीस यांनी उपराष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेतल्यानंतर त्यांच्या या तामिळनाडूतील गावामध्ये उत्सव साजरा करण्यात आला यावेळी गावातील मंदिरांमध्ये विशेष पूजेचे आयोजन करण्यात आलं होतं. तर ग्रामस्थांनी हॅरिस त्यांच्यासाठी प्रार्थना केली.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!