Share

सोनू सूदच्या नावाने ॲम्बुलन्स सेवा सुरु; अशा प्रकारे करणार लोकांची मदत

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : करोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणामुळे देशभरातील लोकांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. लॉकडाऊन दरम्यान अनेक हातावर पोट असणाऱ्या लोकांवर मोठ संकट ओढावले होत. लाखो लोक बेरोजगार झाले आहेत. अशा प्रतिकूल परिस्थितीत अनेकांनी गरजूंना मदत करण्याचे कार्य केले. अशीच मदतीचा हात अभिनेता सोनू सूदने पुढे केला. शेकडो मजुरांना त्यांच्या घरी पोहोचवलं, अनेकांना रोजगार मिळवून दिला. गरीब विद्यार्थांना शिक्षणासाठी आर्थिक मदत केली. त्याच्या या दानशुरपणाची सर्वत्र स्तुती होत आहे.

नुकतंच सोनूने केलेल्या चांगल्या कामाने प्रेरित होऊन हैदराबादमधील एका व्यक्तीने अ‍ॅम्बुलन्स सर्व्हिस सुरू केली आहे. त्या व्यक्तीने सोनू सूदच्या नावानेच ही सेवा सुरू केली आहे. शिवा असं अ‍ॅम्बुलन्स सर्व्हिस सुरू करणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे. शिवा व्यवसायाने एक जलतरणपटू आहे. त्याने 100 हून अधिक लोकांना तलावात उडी मारून जीवन संपवणाऱ्यांना वाचवलं आहे. त्यामुळे लोकांमध्ये तो अतिशय चर्चेत आहे.

त्याच्या या चांगल्या कामामुळे त्याला डोनेशनही मिळू लागलं. शिवाने सुरू केलेल्या अ‍ॅम्बुलन्स सर्व्हिसचं नाव ‘सोनू सूद अ‍ॅम्बुलन्स सर्व्हिस’ असं ठेवलं आहे. याचं उद्धाटनही स्वत: सोनूने केलं आहे. शिवाच्या या कामासाठी सोनूने त्याचं कौतुक केलं असून, त्याला अशाप्रकारे चांगलं काम सुरू ठेवण्याचं सांगितलं आहे.

यावेळी बोलताना सोनूने सांगितलं की, आपल्याला शिवासारख्या आणखी अनेक लोकांची गरज आहे. जे असं चांगलं काम करण्यासाठी आमची मदत करतील. या उद्धाटनात सामिल झाल्याचा अतिशय आनंद झाल्याचं सांगत, त्याने शिवाचे आभार मानले आहेत.

 

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!