Share

‘माझ्या लेव्हलची व्यक्ती असेल तरच त्याला उत्तर देईल’

Published On: 

मुंबई : मनसे मध्यवर्ती कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी हर्षवर्धन जाधव यांनी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचे थेट नाव घेऊन राज्यात तुमचा मुख्यमंत्री आहे, तेव्हा औरंगाबादचे संभाजीनगर करून दाखवा, नाहीतर महापालिका निवडणुकीत तुम्हाला शहरातून फिरू देणार नाही असे खुले आव्हान दिले होते.

याच पार्श्वभूमीवर माध्यमांशी बोलताना शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी हर्षवर्धन जाधव यांनी दिलेल्या आव्हानाची खिल्ली उडवली. याबाबत बोलताना ते म्हणाले की, ‘यावर मी अधिक बोलणार नाही. माझ्या लेव्हलची व्यक्ती असेल तरच त्याला उत्तर देईल, अशा शब्दात शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी हर्षवर्धन जाधव यांना लक्ष्य केलं.

पुढे बोलताना खैरे म्हणाले, ‘मुख्यमंत्री उध्दव ठाकरे या शहराचे संभाजीनगर अशा नामकरणाची घोषणा कोणत्याही क्षणी करतील, हे मी यापूर्वीही सांगितले आहे. त्यामुळे संभाजीनगर वरून हर्षवर्धन जाधव सारख्या व्यक्तीने शिवसेनेला आव्हान देण्याच्या भानगडीत पडू नये, असे खैरे यांनी सांगितले.

दरम्यान, ‘हर्षवर्धन जाधव हा वेडा माणूस आहे, यांच्या टीकेला उत्तर द्यावे एवढी त्यांची लायकी नाही,’ असे म्हणत चंद्रकांत खैरे यांनी हर्षवर्धन जाधव यांच्यावर शाब्दिक निशाणा साधला.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!