तुळजापूर : सरकारी नोकऱ्या तसेच शैक्षणिक प्रवेशात मराठा आरक्षण देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने २०१८ साली बनविलेल्या कायद्याच्या अंमलबजावणीस सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी तात्पुरती स्थगिती दिली. ज्यांना यापूर्वी या आरक्षणाचा लाभ मिळाला आहे, त्याला धक्का लागणार नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
या स्थगितीमुळे मराठा समाजाला मोठा धक्का बसला असून आता राज्य सरकारच्या अपयशामुळे या आरक्षणावर स्थगिती आल्याची टीका केली जात आहे. महाविकास आघाडी सरकारने मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयात गांभीर्याने टिकवले नसल्याचे मराठा क्रांती समन्वयकांनी याआधी देखील आरोप केले होते. आता तुळजापूरचे भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी देखील महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे.
“शेवटी घात झालाच ! देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षण देऊनच दाखवलं…आणि उध्दव ठाकरेंनी स्थगित करूनच दाखवलं ” अशी टीका त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केली असून ‘काळा दिवस’ असा देखील उल्लेख केला आहे. दरम्यान, भाजपा आमदार नितेश राणे यांनी थेट सरकारला इशारा देत म्हटलं आहे की, या सरकारनी मराठयांचा विश्वासघात केला, आज आमच्या समाजाच भविष्य अंधारात गेले आहे.
महत्वाच्या बातम्या:-
‘तेव्हा उद्धव ठाकरे म्हणाले होते, राज्यातील पोलीस भांडी घासायच्या लायकीचे आहेत !’
कंगनाच्या ट्विटला जितेंद्र आव्हाडांचं उत्तर म्हणतात …
दिशा सालीयानच्या पार्टीत आदित्य ठाकरे उपस्थित होते- नुपूर मेहता
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

