मुंबई : अभेनेत्री कंगना रनौतची मुंबईत दाखल झाल्यावरही शिवसेनेनेवर टीकेची मालिका सुरूच असल्याचे पाहायला मिळत आहे. काल मुंबईत दाखल झाल्यावर कंगनाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती आता कंगनाच्या खार परिसरात असलेल्या फ्लॅटवरुन कंगना रनौतनं आता शरद पवारांकडे बोट दाखवलं आहे. यासंदर्भात तिनं ट्वीट केलं असून त्यानंतर मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी कंगनाला तिचं नाव न घेता उत्तर दिले आहे
यावर मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी कंगनाचं नाव न घेता टीका केली आहे. आव्हाड यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, शरद पवार यांनी महाराष्ट्र उभा केला, बांधला. हे संपूर्ण महाराष्ट्राला माहितीये. पण जिला महाराष्ट्राबाबत काहीच माहीत नाही ती म्हणते त्यांनी बिल्डिंग बांधली
कंगनानं ट्वीट करत म्हटलं आहे की, महाराष्ट्र सरकारचे पेड सोर्स चुकीची माहिती पसरवत आहेत. बीएमसीने कालपर्यंत मला कधीही नोटीस पाठविली नाही. खरं तर सर्व कागदपत्रांच्या नूतनीकरणासाठी मी स्वत: सर्व कागदपत्रं बीएमसीला दिली होती. बीएमसीसमोर किमान आपल्या धैर्याने उभे राहण्याची ताकत माझ्यात आहे. आता खोटं का बोलत आहेत? असा सवाल कंगनानं ट्वीटमधून केला आहे.
सन्मा. श्री. शरदचंद्रजी पवार साहेबांनी महाराष्ट्र उभा केला, बांधला. हे संपूर्ण महाराष्ट्राला माहितीये.
पण जीला महाराष्ट्राबाबत काहीच माहीत नाही ती म्हणते त्यांनी बिल्डिंग बांधली.#मानसिकरोगी#UdhavThackeray
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) September 9, 2020
महत्वाच्या बातम्या
उर्वरित आठ जिल्ह्यातील तलाठी भरती प्रक्रिया तातडीने पूर्ण करणार : महसूल मंत्री बाळासाहेब थोरात
‘तुम कुछ नहीं हो’ ; कंगना रणौतचा पुन्हा उद्धव ठाकरेंवर घणाघात
‘बेबी पेंग्विन गोइंग डाऊन’ ; नितेश राणेंचा खोचक निशाणा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

