Share

‘तेव्हा उद्धव ठाकरे म्हणाले होते, राज्यातील पोलीस भांडी घासायच्या लायकीचे आहेत !’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : गेले काही दिवस राज्यातील राजकीय वातावरण हे तापले असून अभिनेत्री कंगना रणौतने मुंबई पोलीस आणि व्यवस्थेवर आवाज उठवल्यानंतर शिवसेनेनं हा मुद्दा ‘मराठी अस्मिता, मुंबई पोलिसांची कार्यक्षमता’ या विषयांवर पोहोचवला. तर, काल राजकीय सुडबुद्धीने तिच्या कार्यालयावर तोडफोडीची कारवाई केली गेली असल्याचे आरोप लावले आहेत.

राज्याचे माजी मुख्यमंत्री  व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी एक धक्कादायक घटना समोर आणली. एका भाषणावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई पोलिसांची तुलना थेट भांडी घसण्याच्या लायकीशी केल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनात सांगितले.

” मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना काही काळापूर्वी कल्याणच्या सभेत राज्यातील पोलीस हे भांडी घासायच्या लायकीचे आहेत, असे विधान केले होते. भूमिका बदलल्या की आपण कसे बदलतो याचं हे एक उदाहरण आहे. चर्चा करायची असेल, विषयांतर, विषय बदलायचे असतील तर ते कसं काय बदलता येतात हे आपण बघितलं आहे.” अशी टीका देखील फडणवीसांनी केली.

यासोबतच देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मी राज्याचा गृहमंत्री म्हणून काम पाहिले आहे. त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेबाबत मला पूर्ण कल्पना आहे. मात्र कधी कधी राजकीय हितसंबधांचा प्रभाव पोलिसांच्या कामगिरीवर होतो. आता पोलिसांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याबाबत म्हणाल तर या सभागृहामध्येही अनेकदा पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

महत्वाच्या बातम्या:-

कंगनाच्या ट्विटला जितेंद्र आव्हाडांचं उत्तर म्हणतात …

उर्वरित आठ जिल्ह्यातील तलाठी भरती प्रक्रिया तातडीने पूर्ण करणार : महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

‘तुम कुछ नहीं हो’ ; कंगना रणौतचा पुन्हा उद्धव ठाकरेंवर घणाघात

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!