Share

शिवसेना सोडलेल्या नरेंद्र पाटलांचं ठरलं ! म्हणाले, ‘फडणवीस सांगतील तेव्हा…’

Published On: 

सोलापूर : माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी शिवबंधन सोडत अखेर शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ केला आहे. महाविकास आघाडीचे सरकार येवून दीड वर्ष होत आले, तरी माथाडी कामगारांचे प्रश्न मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सोडविलेले नसल्याचं त्यांनी बोलून दाखवलं. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे बैठकीबाबत वेळ मागूनही ते भेटत नाहीत. यामुळे आपण शिवसेनेला जय महाराष्ट्र करण्याचा निर्णय घेतला असल्याचे माथाडी कामगार नेते आणि माजी आमदार नरेंद्र पाटील यांनी काल जाहीर केलं.

नरेंद्र पाटील यांनी लोकसभेची निवडणूक सातारा मतदार संघातून शिवसेना उमेदवार म्हणून लढवली होती. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचे आपले जिव्हाळ्याचे संबंध असून ते शिवसेना नेत्यांच्या डोळ्यात खुपत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. मी शिवसेनेत राहू नये अशीच पक्षातील नेत्यांची इच्छा असल्याने आपण नाईलाजास्तव शिवसेना सोडत असल्याचे नरेंद्र पाटील यांनी कालचं सांगितलं होतं.

आता पुढील राजकीय प्रवासाबाबत नरेंद्र पाटील काय निर्णय घेणार ? अशी चर्चा रंगत असतानाच त्यांचा भात प्रवेश निश्चित असल्याची देखील कुजबुज सुरु झाली होती. दरम्यान, याबाबत आता नरेंद्र पाटील यांनी भाष्य केलं आहे. ‘यापुढे भाजपसाठी काम करणार असून देवेंद्र फडणवीस सांगतील तेव्हा पक्ष प्रवेश होईल,’ असे अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी सोलापूर येथे सांगितले.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!