Share

मुख्यमंत्र्यांपेक्षा संत नेहमीच श्रेष्ठ आहेत हे ध्यानात घ्यावे, रयत क्रांती संघटनेचा हल्लाबोल

Published On: 

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा इतिहासात प्रथमच आषाढी एकादशीला संतांच्या पालख्या एसटीमधून पंढरपूरला घेऊन जाण्यात आल्या आहेत. दरवर्षी लाखो वारकरी हरी नामाचा गरज करत वारीमध्ये सहभागी होतात. मात्र, सध्या जगभरासह महाराष्ट्रात कोरोनाने थैमान घातल्याने पालखी सोहळा रद्द करण्यात आला .

धक्कादायक : ‘या’ लोकप्रिय भाजप आमदारासह संपूर्ण कुटुंब कोरोना पॉझिटिव्ह

दरम्यान, पंढरपूरला विठूमाऊलीच्या भेटीसाठी शिवशाही बसमधून जाणाऱ्या संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे ७१ हजार रुपयांचे तिकीट एसटी महामंडळाने फाडले आहे. शासनाने विनामूल्य बस उपलब्ध करून देण्यास असमर्थता दाखविल्याने परिवहन महामंडळाची असंवेदनशील कामगिरी त्यानिमित्ताने समोर आली आहे.

रयत क्रांती संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष पांडुरंग शिंदे यांनी याच मुद्यावरून सरकारला लक्ष्य केले आहे. आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला विठूमाऊलीच्या भेटीसाठी शिवशाही बस मधून जाणाऱ्या त्र्यंबकेश्वर येथील संतश्रेष्ठ निवृत्ती महाराजाच्या पालखीचे ७१ हजार रुपयाचे तिकीट एसटी महामंडळाने फाडले ही दुर्दैवी घटना आहे ,राज्य सरकारने समस्त वारकरी संप्रदायाचा केलेला हा अपमान आहे. एस.टी महामंडळ राज्य सरकारच्या परिवहन खात्यांतर्गत काम करते. परिवहन खात्याच्या मंत्र्याला हे माहित नव्हते का ? निवृत्ती महाराजांची पालखी जाणार आहे संबंधित सर्व व्यवस्था राज्य शासनाने करणे गरजेचे होते .वारकरी संप्रदायाचा अतिशय जिव्हाळ्याचा व भावनेचा संबंध असलेल्या पालखी सोहळा हा एसटी महामंडळने जाणार आहे. हे माहित असून सुद्धा त्यांनी ही केलेली कृती असंवेदनशील आहे.

काय आठवड्यापूर्वी भीम गर्जना करत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार संत ज्ञानेश्वर माऊली व संत तुकाराम महाराज यांच्या पादुकाची पालखी हेलिकॉप्टरने जाणार असे सांगितले होते पण ती घोषणा हवेतच विरळली. किमान एसटी महामंडळाच्या बसने सन्मानाने तरी सर्व संतांच्या पालख्या पंढरपूरला जाणे अपेक्षित होतं.पण तसे झाले नाही एस.टी महामंडळाने भाडे घेऊन निःशुल्क होणाऱ्या वारीला गालबोट लावले.या कृत्यातून राज्यातील सर्व जनतेच्या भावना दुखावलेल्या आहेत. मुख्यमंत्र्यांपेक्षा संत नेहमीच श्रेष्ठ आहेत हे ध्यानात घ्यावे असं शिंदे यांनी म्हटलं आहे.

मुख्यमंत्री साहेब गाडीचा नव्हे तर राज्याचा सारथी व्हा !

दरम्यान, याप्रकरणी आता परिवहन मंत्री अनिल परब यांनी खेद व्यक्त केला आहे. तसंच याप्रकरणाच्या चौकशीचे आदेशही अनिल परब यांनी दिले आहेत. ‘निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी नाशिकमधून एसटी बससाठी गैरसमजातून वारकऱ्यांसाठी पैसे घेतले गेले आहेत. त्याबद्दल मी खेद व्यक्त करतो. या सगळ्या वारकऱ्यांचे पैसे परत केले जाणार आहेत. या सर्व प्रकाराबद्दल चौकशीचे आदेश दिले आहेत. यासंदर्भात संबंधित दोषींवर कारवाई करणार आहे,’ असं वक्तव्य अनिल परब यांनी केलं आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!