पणजी : गेल्या काही दिवसांपासून दररोज देशातील करोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. गेल्या २४ तासांमध्ये देशात १९ हजार १४८ करोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. दिसरभरात ४३४ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
‘राजेश टोपे महाराष्ट्राला उल्लू बनवत आहेत, महाराष्ट्राची माफी मागून राजीनामा द्या’
करोनाबाधितांची एकूण संख्या ६ लाख ४ हजार ६४१ इतकी झाली आहे. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार सध्या देशात २ लाख २६ हजार ९४७ अॅक्टिव्ह केसेस असून आतापर्यंत ३ लाख ५९ हजार ८५९ जणांना उपचारानंतर रुग्णालयातून सोडण्यात आलं आहे. गेल्या २४ तासांमध्ये देशात १९ हजार १४८ करोनाबाधितांची नोंद झाली. तर दुसरीकडे दिलासादायक बाब म्हणजे ११ हजार ८८१ रुग्णांना उपचारानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं.
दरम्यान,खेळाडू,कलाकार,पोलीस यासह अनेक राजकीय नेते सुद्धा आता कोरोनाच्या विळख्यात अडकत असल्याचे दिसून येत आहे. गोव्यात भाजपाचे आमदार क्लाफास डायस यांच्यासह पूर्ण कुटुंब कोरोना पाॅझिटिव्ह असल्याचे गुरुवारी स्पष्ट झाले. दक्षिण गोव्यातील कुंकळ्ळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार डायस हे मंगळवारी कोविड पाॅझिटिव्ह आढळून आले होते. त्यानंतर आज गुरुवारी त्यांची पत्नी व दोन्ही मुले कोविड पाॅझिटिव्ह आढळून आली. गोव्यात आमदार व त्याचे कुटुंबीय कोविडग्रस्त आढळण्याची ही पहिलीच वेळ आहे.
“मोदींच्या मतदारसंघात कामगारांची परिस्थिती बिकट, घर गहाण ठेवून काढताहेत दिवस”
एका बाजूला हे चित्र असताना दुसरीकडे गोव्यात 2 जुलैपासून पर्यटन सुरु करण्यात आलं आहे. राज्य सरकारनं जारी केलेल्या एसओपीप्रमाणे चालू शकणाऱ्या 250 हॉटेल्सला पर्यटन विभागाकडून सुरु करण्याची परवानगी देण्यात आली आहे.विदेशातील पर्यटकांना मात्र अद्याप गोव्यात येता येणार नसल्याचे राज्य सरकारच्या वतीने सांगण्यात आले आहे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

