Share

गांधी कुटुंबाला त्रास देणे योग्य नाही, निवासस्थान काढून घेणे दुर्देवी – थोरात

Published On: 

मुंबई : कॉग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका वाड्रा यांना गृह निर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयाने मंत्रालयाने एका महिन्याच्या आत बंगला खाली करण्यास सांगितलं आहे. या नोटिसमध्ये प्रियंका गांधी यांना 1 ऑगस्ट पर्यंत लोधी इस्टेट येथील बंगला रिकामा करण्यात यावा असं सांगण्यात आलं आहे.

कोविड योद्धे वगळता इतर विभागातील कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार कपात – विजय वडेट्टीवार

गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार यांनी पाठवलेल्या अधिकृत पत्रात, प्रियंका वाड्रा यांना आता एसपीजी सुरक्षा नसल्याने त्या राहत असलेला दिल्लीतील लोधी रोडवरील बंगला रिकामा करावा. असं म्हटलं आहे.

मागील वर्षी प्रियंका वाड्रा यांची विशेष सुरक्षा काढून त्यांना Z+ सुरक्षा देण्यात आली होती. नियमांनुसार सुरक्षा व्यवस्था पुरवताना विशेष सुरक्षा पुरवली जाईल त्याला सरकारी बंगल्याची तरतूद आहे. मात्र, झेड सुरक्षा व्यवस्थेत सरकारी निवासस्थानाची तरतूद नाही. याचाच आधार घेऊन प्रियंका गांधी यांना ही नोटीस देण्यात आली आहे.

सरकारी आदेशानुसार प्रियंका गांधी यांना 1 ऑगस्ट 2020 पूर्वी हा सरकारी बंगला सोडावा लागेल. त्यांना देण्यात आलेल्या अधिकृत नोटीसमध्ये त्यांनी निश्चित वेळेत बंगला रिकामा न केल्यास त्यांना आर्थिक दंडही होऊ शकतो.

केंद्र सरकारच्या या नोटीसनंतर काँग्रेसने यावर थयथयाट केला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी याच मुद्द्यावरून केंद्र सरकारवर टीका केली आहे. प्रियंका गांधी यांची सुरक्षा आणि निवासस्थान काढून घेणे हे दुर्देवी आहे. प्रियंका गांधी यांनी त्यांच्या आजी देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि वडील राजीव गांधी यांचा मृत्यू पाहिला आहे. आजही त्यांच्या कुटुंबावरील संकटे संपलेली नाहीत त्यांना धोका आहे. असे असताना केवळ राजकारण म्हणून त्यांना त्रास देणे योग्य नसल्याचं थोरात यांनी म्हटलं आहे.

हे अन्यायकारक वीजबिल सरकारने माफ करावे – हर्षवर्धन पाटील

प्रियंका गांधी आणि राहुल गांधी यांची लोकप्रियता वाढते आहे. त्या सरकारच्या चुकीच्या निर्णयाबद्दल प्रश्न विचारत आहेत. त्यांनी प्रश्न विचारू नयेत म्हणून त्यांच्यावर दबाव टाकण्याचा हा प्रयत्न आहे. सरकारकडे या प्रश्नांची उत्तरे नाहीत म्हणून अशा गोष्टी करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न सरकार आहे पण प्रियंका गांधी,राहुल गांधी आणि काँग्रेस पक्ष जनतेच्या हितासाठी सरकारला प्रश्न विचारत राहील आणि जनतेच्या प्रश्नांवर संघर्ष करत राहील असं थोरात यांनी म्हटलं आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!