टीम महाराष्ट्र देशा : सत्ता स्थापनेच्या मुद्यावरून भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये जोरदार टोलेबाजी सुरु आहे. त्यात आता भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी पुन्हा एकदा राज्यात युतीचचं सरकार येणार असा विश्वास व्यक्त केला आहे. तर वाघ कितीही गुरगुरला तरी त्याचं संवर्धन आणि सरंक्षण करणं, ही माझी जबाबदारी आहे. त्यामुळं कुणी गुरगुरतो म्हणून आपण वाघाला सोडत नाही, असा उपरोधिक टोला त्यांनी शिवसेनेला लागवला आहे.
सुधीर मुनगंटीवार यांनी शुक्रवारी राज्यात मुदतीच्या आत सरकार स्थापन केले नाही तर राज्यात राष्ट्रपती राजवट लागेल, असे वक्तव्य केले होते. यावरून शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेत. शिवसेना नेते संजय राऊत यांनी राष्ट्रपती राजवटीची धमकी देऊ नका. राष्ट्रपती काय तुमच्या खिशातले आहेत का ? असा सवाल मुनगंटीवार यांना विचारला होता. यावर आता सुधीर मुनगंटीवार यांनी उत्तर दिले आहे.
ते म्हणाले की, मी काहीही तोडण्याची किंवा धमकीची भाषा केली नाही. एखाद्या घटनात्मक तरतुदीची माहिती देणं, ही धमकी असू शकते का, असा प्रतिसवाल त्यांनी केला. तसेच मी वनमंत्री आहे. त्यामुळं वाघ कितीही गुरगुरला तरी त्याचं संवर्धन आणि सरंक्षण करणं, ही माझी जबाबदारी आहे. त्यामुळं कुणी गुरगुरतो म्हणून आपण वाघाला सोडत नाही. वाघाला सोबत ठेवायचं आहे, त्याच संगोपन आणि संरक्षण करण्यासाठी, असेही मुनगंटीवार म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1190532254188982273?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1190531991046737920?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1190531385330565121?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

