Share

‘लक्ष्य तक पहुंचने से पहले सफर में मजा आता है’ – संजय राऊतांनी लगावला भाजपला टोला

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीत जनतेने महायीतुला बहुमत देऊनही  राज्यात अद्याप सत्ता स्थापन झालेली नाही. भाजप शिवसेनेत निवडणुकानंतर फिफ्टी फिफ्टीच्या सुत्रामुळे सत्ता स्थापनेचा तिढा सुटलेला नाही.शिवसेनेचे नेते संजय राऊत दररोज आक्रमक भुमिका मांडताना दिसत आहे. त्यातच आज त्यांनी पुन्हा एकदा ट्वीट करून भाजपवर निशाणा साधला आहे.

आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीमध्ये भाजपाचे अध्यक्ष अमित शाह यांच्याशी चर्चा करण्यासाठी गेलेले असतानाच राऊतांनी प्रवास करण्यावरुन ट्विट करत एक टोला लगावला आहे. संजय राऊत यांनी केलेल्या ट्विटमध्ये त्यांचा आणि शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचा एकत्र चालताना फोटो आहे. या फोटोला त्यांनी ”जय हिंद” असे कॅप्शन दिले आहे. तसेच या फोटोवर ‘लक्ष्य तक पहुंचने से पहले सफर में मजा आता है’, असे वाक्य लिहिलेले आहे.

सध्या राज्यामध्ये सत्ता स्थापन करणे हे भाजपा आणि शिवसेनेचे लक्ष्य असून त्यासाठी वेगवेगळ्या मार्गांचा विचार दोन्ही पक्षांकडून सुरु असतानाच राऊत यांनी हे ट्विट केले आहे. रविवारीही राऊत यांनी शायर वसीम बरेलवी यांचा ‘उसूलों पर जहाँ आँच आये, टकराना ज़रूरी है जो ज़िन्दा हो, तो फिर ज़िन्दा नज़र आना ज़रूरी है…’ हा शेर ट्विट करत भाजपाला टोला लगावला होता.

महत्त्वाच्या बातम्या :

https://twitter.com/Maha_Desha/status/1191257178138501120?s=20

 

https://twitter.com/Maha_Desha/status/1191257307574747136?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!