🕒 1 min read
मुंबई : काल रात्री निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे यांच्या गटाला ‘शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)’ हे नाव दिलं असून, ‘मशाल’ चिन्ह दिलं आहे. तर एकनाथ शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ असं नावं दिलं असून, आयोगाकडून शिंदे गटाला अद्याप कोणतच चिन्ह मिळालं नाहीय. आयोगाने दिलेल्या या निर्णयावर अनेकांनी आप-आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. अशातच ठाकरे गटातील शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.
शिंदे गटाला जे हवं आहे, तेच त्यांना कसं मिळतं? असा सवाल त्यांनी विचारला आहे. शिंदे गट जे सांगतात, जे आगोदर बोलतात, ते सगळं त्यांच्या बोलण्याप्रमाणे घडत आहे. त्यांना जे हवं आहे, ते सगळं मिळतंय. म्हणजे शिंदे गटाचे विचार आणि त्यांची संशोधक वृत्ती निवडणूक आयोगासारख्या महत्त्वाच्या संस्थांशी एवढी कशी काय जुळते, हे सर्व जनता बघत आहे, अशी प्रतिक्रिया अनिल देसाईंनी दिली आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगानं दिलेला निर्णय आम्ही मान्य केला आहे. पण आयोगाच्या निर्णयानंतर सोशल मीडियात बऱ्याच प्रतिक्रिया उमटल्या आहेत. त्यातून आयोगानं प्रबोधन घेणं महत्त्वाचं आहे. लोकशाहीचा कणा असलेल्या नागरिकांचं म्हणणं काय आहे? हे आयोगानं बघितलं पाहिजे. आपण कितीही विद्वान असलो तरी समाज काय म्हणतोय? याकडेही लक्ष देणं गरजेचं आहे. असंही देसाई यावेळी बोलताना म्हणाले.
मशाल’ हे निवडणूक चिन्ह दिल्याबद्दल अनिल देसाई यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. अनिल देसाई म्हणाले, “अर्थात आम्ही जे पर्याय सूचवले होते, त्यातील एक चिन्ह आम्हाला देण्यात आलं याबद्दल आम्ही समाधानी आहोत. पण सर्वोच्च न्यायालयात अनेक महत्त्वाच्या आणि गंभीर स्वरुपाच्या याचिका प्रलंबित आहेत. त्यासंदर्भात अद्याप निर्णय होणं बाकी आहे. असं असताना निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे संविधानात्मक पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे दोन्ही संस्थांनी योग्य पद्धतीने हे प्रकरण हाताळावं अशी इच्छा अनिल देसाई यांनी यावेळी व्यक्त केली.
शिंदे गटाकडून सादर केलेल्या नवीन चिन्हांवर अनिल देसाई म्हणाले, शिंदे गटाकडून जे मागितलं जातं तेच त्यांना मिळतंय. त्यामुळे हे सर्व अगोदरच ठरलेलं आहे की काय? अशी मनात शंका निर्माण होते. ते जे म्हणतील, तेच घडतंय. त्यामुळे या संस्थांचं आणि शिंदे गटाच्या विचारांचं गणित एवढं कसं काय जुळतंय? हा एक चमत्कारीक प्रश्न प्रत्येकाच्या मनात निश्चितच निर्माण होत आहे. त्यांनी काहीही धारण केलं तरी शेवटी खरं ते खरं असतं, अर्थात या सगळ्या गोष्टींना जनता न्याय देईल, असंही देसाई पुढे म्हणाले. दरम्यान, निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर अनेक राजकीय पडसाद उमटलेले पाहायला मिळत आहेत. ठाकरे गटाच्या अनेक नेत्यांकडून आयोगाच्या कार्यप्रणालीवर शंका घेतली आहे. या संदर्भात पुढे काय होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Viral Video | ‘या’ मुलाचा अतरंगी डान्स बघून व्हाल थक्क! पाहा व्हिडिओ
- Ram Kadam । “बाळासाहेबांचे दुश्मन आजही उद्धवजींना अति प्रिय”; राम कदम यांचा ठाकरेंवर निशाणा
- Raj Thackeray | राज्यात ठाकरे विरुद्ध शिंदे गट वाद सुरु असताना राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिले ‘हे’ आदेश
- Urfi Javed | बोल्ड अंदाजासह ‘उर्फी जावेद’चे नवीन गाणे रिलीज
- Kishori Pednekar | ‘मशाल’ चिन्ह मिळाल्यानंतर किशोरी पेडणेकरांचा शिंदे गटाला इशारा, म्हणाल्या…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
