मुंबई : निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे यांच्या गटाला ‘शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)’ हे नाव दिलं असून, ‘मशाल’ चिन्ह दिलं आहे. आयोगाच्या या निर्णयानंतर ठाकरे गटातील अनेक नेत्यांनी आप-आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. निवडणुक आयोगाने शिवसेनेचं पक्षचिन्हं गोठवल्यानंतर ठाकरे आणि शिंदे गटात आरोप-प्रत्यारोपांचे सत्र सुरू असतानाच भाजपचे आमदार राम कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
अंधेरी पूर्व पोटनिवडणूकीसाठी ठाकरे यांच्या शिवसेनेला काँग्रेसने पाठिंबा दिला. आता याच मुद्द्यावर भाजपने ठाकरेंवर टिका केली आहे. “हातात आज मशाल घेण्याची का वेळ आली ? असा प्रश्न राम कदम यांनी ट्विटच्या माध्यमातून विचारला आहे. स्वर्गीय बाळासाहेबांनी ज्या काँग्रेस सोबत आयुष्यात कधीही जाणार नाही असे निक्षून सांगितले. जन्मभर त्यांनी काँग्रेस वर कडा प्रहार केला. तेच स्वर्गीय बाळासाहेबांचे दुश्मन आजही, माननीय उद्धवजींना अति प्रिय असल्याच राम कदम यांनी ट्विट मध्ये म्हंटल आहे.
“हातात आज मशाल घेण्याची का वेळ आली ? स्वर्गीय बाळासाहेबांनी ज्या काँग्रेस सोबत आयुष्यात कधीही जाणार नाही असे निक्षून सांगितले. जन्मभर त्यांनी काँग्रेस वर कडा प्रहार केला. तेच स्वर्गीय बाळासाहेबांचे दुश्मन आजही, माननीय उद्धवजींना अति प्रिय आहेत. त्यांच्या गळ्याला गळा आहे. ” अशा आशयाचं ट्विट राम कदम यांनी केलं आहे.
हातात आज #मशाल घेण्याची का वेळ आली ? #स्वर्गीय #बाळासाहेबनी ज्या #काँग्रेस सोबत आयुष्यात कधीही जाणार नाही
असे निक्षुन सांगितले.. जन्मभर त्यांनी काँग्रेस वर कडा प्रहार केला..
तेच स्वर्गीय बाळासाहेबांचे दुश्मन आजही …
माननीय उद्धवजीना अति प्रिय आहेत .. गळ्याला गळा pic.twitter.com/5jbQZe2q0w
— Ram Kadam (@ramkadam) October 11, 2022
उद्धव ठाकरे यांच्या उध्वस्त होण्याची कारणे दूर नाहीत. आपल्या वडिलांचे न ऐकल्याचे हे परिणाम असल्याचं राम कदम यांनी म्हंटल आहे. बाळासाहेबांचे न ऐकल्यामुळे आज अनेक शिवसेना कार्यकर्ते उद्धव ठाकरे यांच्यापासून दूर गेल्याच राम कदम म्हणालेत. दरम्यान, अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूकीत कॉंग्रेसने शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि काँग्रेस राज्याचे नेते यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती. राम कदम यांच्या या वक्तव्याला उद्धव ठाकरे काय उत्तर देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Kishori Pednekar | उषःकाल आतापासून सुरू झाला; चिन्ह मिळाल्यानंतर किशोरी पेडणेकरांची प्रतिक्रिया
- Upcoming Vivo Mobile | लवकरच होणार Vivo ची ‘ही’ मोबाईल सिरिज लाँच
- Ravi Rana | उद्धव गटाला मिळालेलं नाव ‘उद्धव काँग्रेस सेना’ ; रवी राणांचा ठाकरेंवर निशाणा
- Aravind Sawant। “आता मशालीची धग सहन करा”; बाळासाहेब ठाकरे यांचं ३८ वर्ष जुनं व्यंगचित्र व्हायरल
- Instagram Reel | Instagram Reel कसे करायचे डाऊनलोड? जाणून घ्या!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

