Share

आमदार खरेदी करणे, सरकार पाडणे हा भाजपाचा स्वभाव बनला आहे : कॉंग्रेस

Published On: 

नवी दिल्ली-  राजस्थानमध्ये काँग्रेसमध्ये सुरु असलेला अंतर्गत कलह अवघ्या जगासमोर आला आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या विरुद्ध युवा नेते सचिन पायलट यांनी मोठे आव्हान निर्माण केले आहे. कॉंग्रेस पक्ष भाजपच्या नावाने रोज विविध आरोप करत असल्याचे चित्र आहे.

आता काँग्रेसने ट्विटर अकाऊंटवरुन भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री अमित शहांवर आमदार खरेदीचा आरोप करत त्यांना टोला लगावला आहे. सत्तेच्या भुकेपोटी भाजपा देशातील लोकशाही परंपरेचा अपमान करत आहे, आमदार खरेदी करणे, सरकार पाडणे हा भाजपाचा स्वभाव बनला आहे. लोकशाहीच्या हत्येचा हा खेळ जास्त दिवस चालणार नाही. अरुणाचल प्रदेश, गोवा, मणिपूर येथे हॉर्स ट्रेडिंग, कर्नाटक, मध्यप्रदेश, महाराष्ट्र येथे लोकशाहीचा अपमान, तर गुजरात, राजस्थानमध्ये घोडेबाजाराचा प्रयत्न अशा शब्दात काँग्रेसने केंद्रीय मंत्री अमित शहांवर निशाणा साधला आहे.

दुसरीकडे आता महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी देखील भाजपवर शरसंधान केले आहे. थोरात यांनी राजस्थानच्या राज्यपालांनी विधानसभेचे अधिवेशन बोलवावे, अशी मागणी केली आहे. सत्ता, पैसा व बलाच्या जोरावर भाजप सरकार लोकनियुक्त कग्रेस सरकार पाडण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे.

बाळासाहेब थोरात म्हणाले, ‘लोकशाहीच्या रक्षणासाठी स्वातंत्र्य लढ्याप्रमाणे लढा उभारण्याची वेळ आली आहे. काँग्रेसने स्वातंत्र्याची लढाई लढली आणि जिंकली. मात्र, आता पुन्हा एकदा लढण्याची वेळ काँग्रेसवर आणि कार्यकर्त्यांवर आली आहे. मिळालेल्या स्वातंत्र्यानंतर आपण जी लोकशाही स्विकारली त्या लोकशाहीची हत्या होत असताना सर्वांना दिसत आहे.

थोरात म्हणाले, पुन्हा एकदा लोकशाही स्थापित करण्यासाठी आणि तिला ताकद देण्याकरता आपण काँग्रेस जणांनी एकत्र येण्याचे आणि चळवळ करण्याची गरज आहे. सरकार पाडण्याचा प्रयत्न सातत्याने केला जात आहे. राजस्थानमध्ये जे घडत आहे ते अत्यंत दुर्दैवी आहे. लोकशाही करता देखील दुर्दैवी आहे. पुन्हा एकदा राजस्थान सरकार राहीले पाहिजे. त्याकरता अधिवेशन बोलावले पाहिजे.

महत्वाच्या बातम्या-

शिवराज सिंह चौहान रुग्णालयात; असा आला पत्नी, मुलांचा कोरोना रिपोर्ट

‘…तर लोक उपासमारीने मरतील’, प्रकाश आंबेडकरांचा उद्धव ठाकरेंना सल्ला

मुंबईत सातत्याने कमी चाचण्यांमुळे होणारी मृत्यूसंख्येत वाढ चिंताजनक;देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!