मुंबई: गेले ३ महिन्यांहून अधिक काळ कोरोना महामारीला प्रतिबंधित करण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आला आहे. जूनपासून थोड्या प्रमाणात सूट जरी देण्यात आली असली तरी पूर्णतः जनजीवन पुन्हा सुरळीत झालेले नाही. त्यातच रुग्णांची वाढती स्थिती बघता टप्प्याटप्प्याने काही शहरांसह जिल्ह्यांत लॉकडाऊन करण्यात येत आहे. यावर, ठाकरेजी तुम्ही खुदा होऊ नका, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली.
प्रकाश आंबेडकर यांनी लॉकडाऊन वाढवू नका, अशी मागणी केली असून लॉकडाऊन वाढल्यास लोक कोरोनाने नाही पण उपासमारीने मरतील अशी आर्त भूमिका देखील त्यांनी मांडली आहे. दरम्यान, काल व आज संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीचे भाग प्रसिद्ध करण्यात आले. यात त्यांनी लॉकडाऊन उठवण्यासंदर्भात नकारात्मक भूमिका मांडली आहे. यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना त्यांनी लॉकडाऊन न वाढवण्याचा सल्ला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिला आहे.
‘ये दिल मांगे मोर’: कारगिल विजय दिनानिमित्त खासदार छत्रपती संभाजी राजेंनी केली ‘हि’ पोस्ट!
“उद्धव ठाकरे, विनंती… खुदा होऊ नका. कोरोना व्हायरसने भीती सगळ्यांना घातली. मीही त्यावेळेस भ्यायलो होतो. ४० टक्के लोक बाधित होतील, असं अमेरिकेच्या हॉपकिन युनिव्हर्सिटीने सांगितलं. पण त्याच्याच आठवड्याभरानंतर ऑस्ट्रेलियन शास्त्रज्ञांनी सांगितलं की भारतात कोरोना व्हायरस पसरु शकणार नाही. त्यांची रोगप्रतिकार शक्ती फार चांगली आहे. ओस्ट्रेलिया जिंकत आहे, असं दिसतंय” असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.
“मास्क वापरायचा कंटाळा आला तर त्या डॉक्टर, नर्सचं स्मरण करा”
तसेच , “कोरोना मृत्यूदर आज दोन टक्के किंवा त्याच्या थोडा वर असताना दिसत आहे. बुद्धांनी एक गोष्ट सांगितली आहे, की माणसं जन्माला आली, की त्यांचं मरण निश्चित. त्यामुळे आता आपल्याला विनंती आहे की देशाची अर्थव्यवस्था आपण आता सुधारण्याच्या पाठीमागे लागावे. तरच माणसं जगतील, नाहीतर उपासमारीने माणसं मरतील अशी परिस्थिती आहे. वंचित बहुजन आघाडीची मागणी आहे, लॉकडाऊन आपण वाढवू नका” अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली.
मुख्यमंत्र्यांच्या मुलाखतीनंतर तुकाराम मुंढेंचे पारडे जड ? नागपूर महापालिकेतील वादाला मिळणार नवे वळण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

