Share

कुंभमेळा, त्रिशूर पूरममध्ये ट्रक घुसवून हल्ला करु; आयसिसचा इशारा

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा – ‘तुम्ही तुमच्या बुद्धिमत्तेचा वापर करा. त्यांच्या जेवणात विष टाका, ट्रकचा वापर करा किंवा कुंभमेळा, त्रिशूर पूरममध्ये ट्रक घुसवा अशा पद्धतीने हल्ला करण्याची सूचना आणि धमकी आयसिसकडून देण्यात आली आहे. कुंभमेळा, त्रिशूर पूरम उत्सवांमध्ये प्रचंड गर्दी असते. त्याच पार्श्वभूमीवर या उत्सवांमध्ये घातपात घडवण्याचा इशारा आयसिसने दिला आहे.एका ध्वनीफितीच्या माध्यमातून ही धमकी देण्यात आली आहे.

आयसिसकडून जारी करण्यात आलेल्या ध्वनीफितीतून चिथावणी देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ‘तुम्ही तुमच्या बुद्धिमत्तेचा वापर करा. त्यांच्या जेवणात विष टाका. ट्रकचा वापर करा. कुंभमेळा, त्रिशूर पूरममध्ये ट्रक घुसवा. आयसिसकडून या मार्गांचा वापर जगभरात केला जात आहे,’ असे ध्वनीफितीच्या माध्यमातून सांगण्यात आले आहे. यासोबतच यामध्ये लास वेगास हल्ल्याचाही उल्लेख आहे. ‘लास वेगासमध्ये आयसिसच्या एका समर्थकाने म्युझिक कॉन्सर्टमध्ये गोळीबार करुन अनेकांना ठार केले. तुम्ही किमान रेल्वे गाड्या रुळावरुन घसरण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. चाकूचा वापर करुन हल्ले करायला हवेत,’ अशी चिथावणी ध्वनीफितीतून देण्यात आली आहे.

आयसिसकडून जारी करण्यात आलेल्या १० मिनिटांच्या ध्वनीफितीमधील आवाज राशिद अब्दुल्लाचा असल्याचा सांगितले जात आहे. राशिद आयसिसच्या कासरगोड मॉड्युलचा सदस्य आहे. तो आयसिसमध्ये दाखल होण्यासाठी अफगाणिस्तानला गेला होता. या ध्वनीफितीमध्ये कुरानचा उल्लेख करण्यात आला आहे. केरळमधील १०० जणांनी आयसिसमध्ये प्रवेश केल्याची माहिती ताजी असतानाच ही ध्वनीफित जारी करण्यात आल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. सध्या ही ध्वनीफित व्हॉट्सअप, टेलिग्राम यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात शेअर करण्यात येत आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!