🕒 1 min read
Jaydev Unadakar | टीम महाराष्ट्र देशा: भारत आणि बांगलादेश कसोटी मालिकेमध्ये सौराष्ट्र संघाचा कर्णधार जयदेव उनाडकर (Jaydev Unadakar) याला भारतीय संघामध्ये खेळण्याची संधी मिळाली आहे. अलीकडेच विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेमध्ये जयदेवने उत्कृष्ट कामगिरी केली होती. त्याच्या या कामगिरीनंतर त्याला बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघात सामील केले आहे.
जयदेव उनाडकरचे तब्बल 12 वर्षानंतर भारतीय कसोटी संघामध्ये पुनरागमन झाले आहे. जयदेव उनाडकरचे 2010 मध्ये कसोटी सामन्यामध्ये पदार्पण झाले होते. मात्र, जयदेवला त्यावेळी फक्त एकच सामना खेळण्याची संधी मिळाली होती. त्याने आपल्या आतापर्यंतच्या कारकिर्दीमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकमेव कसोटी सामना खेळला आहे.
वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीच्या जागी जयदेव उनाडकरचा भारतीय संघामध्ये समावेश करण्यात आला आहे. मोहम्मद शमी वनडे मालिकेतून दुखापतीमुळे बाहेर पडला आहे. दरम्यान, जयदेव सध्या राजस्थानमध्ये असून त्याची व्हिसाची प्रक्रिया पूर्ण होत आहे. ही प्रक्रिया पूर्ण होताच तो बांगलादेशला या सामन्यासाठी रवाना होणार आहे.
जयदेव उनाडकरच्या नेतृत्वाखाली 2019-20 हंगामामध्ये सौराष्ट्र रणजी ट्रॉफीमध्ये चॅम्पियन बनले होते. या स्पर्धेमध्ये जयदेवने तब्बल 67 बळी घेतले होते. तर त्यानंतर त्याने यावर्षी झालेल्या विजय हजारे ट्रॉफी मध्ये सर्वाधिक 19 विकेट घेतले.
सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष जयदेव शहा यांनी जयदेव उनाडकरची कसोटी सामन्यासाठी टीम इंडियामध्ये निवड झाल्याबद्दल त्याचे अभिनंदन केले आहे. सौराष्ट्र संघाने जयदेवच्या नेतृत्वाखाली 2019-20 रणजी करंडक आपल्या नावावर केला होता. त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये जयदेवचे नावावर सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम आहे.
महत्वाच्या बातम्या
- Weight Loss Tips | हिवाळ्यामध्ये वाढते वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी करा ‘हे’ सोपे व्यायाम
- Winter Health Care | हिवाळ्यामध्ये तिळाचे तेल खाल्याने मिळतात ‘हे’ आरोग्यदायी फायदे
- IND vs BAN | आजच्या सामन्यामध्ये भारतीय संघासमोर मोठे आव्हान, जपावी लागेल आपली प्रतिष्ठा
- Most Sixes in 2022 | आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये टीम इंडियातील ‘या’ खेळाडूने लगावले आहेत सर्वाधिक षटकार
- Maharashtra Weather Update | विदर्भ थंडीने गारठला, तर मंदोस चक्रीवादळामुळे राज्यात ‘या’ ठिकाणी ढगाळ वातावरण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

