🕒 1 min read
Urfi Javed | टीम महाराष्ट्र देशा: बिग बॉस OTT (Big Boss OTT) फेम आणि इंटरनेट सेन्सेशन उर्फी जावेद (Urfi Javed) फॅशन म्हणून कधी काय करेल याचा अंदाज लावणे कठीणच नाही तर अशक्य आहे. उर्फी तिच्या अतरंगी फॅशनने नेटकऱ्यांना चकित करून सोडते. उर्फीने असाच काहीतरी अतरंगी लुक केला आहे. त्याचा कुणालाही अंदाज लावता येणार नाही. यावेळी उर्फेने चक्क सायकलमध्ये असणाऱ्या चेन पासून ड्रेस तयार करून, तो परिधान केला आहे.
इंटरनेट सन्सेशन उर्फी जावेद फॅशन म्हणून कधी काय करेल, याचा अंदाज लावणे कठीणच नाही तर आता अशक्य झाले आहे. उर्फीने सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तिची फॅशन बघून सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. या व्हिडिओमध्ये उर्फी सुरुवातीला सायकल चालवताना दिसत आहे. सायकल चालवत असताना उर्फीच्या सायकलीची चेन गळून पडते. साधारण चेन गळून पडल्यावर आपण ती दुरुस्त करून पुन्हा सायकल चालवायला लागतो. मात्र, उर्फीने ती चेन काढून चक्क तिला ड्रेस म्हणून परिधान केले आहे. उर्फीने या चेन पासून टॉप आणि स्कर्ट बनवून परिधान केला आहे.
Urfi Javed | अरे देवा! चक्क सायकलच्या चेनपासून बनवला उर्फीने ड्रेसhttps://t.co/ldc02X1CKR
— Maharashtra Desha महाराष्ट्र देशा (@MHD_Press) December 10, 2022
उर्फीने नुकताच शेअर केलेल्या या लुक मध्ये तिने सायकलच्या चेन पासून टॉप, स्कर्ट आणि ब्रेसलेट तयार केले आहे. या व्हिडिओमध्ये उर्फीने केस मोकळे सोडलेले असून ब्लॅक कलरची हिल्स परिधान केलेली आहे. उर्फीचा हा लुक बघून नेटकऱ्यांनी डोक्यालाच हात लावला आहे. त्याचबरोबर उर्फीच्या या पोस्टवर नेटकऱ्यांकडून कमेंटचा वर्षाव होत आहे.
उर्फीच्या या पोस्टवर नेटकरी संमिश्र कमेंट करत आहे. यामध्ये एक नेटकरी कमेंट करत म्हणाला आहे की,”उर्फी ने माझी सायकल चोरी केली आहे.” तर अजून नेटकरी कमेंट करत म्हणाला की,”अरे दीदी माझ्याकडे दोन जुन्या सायकल पडलेल्या आहे. तुला जर अजून चेन लागत असेल तर मला सांग. शंभर दोनशे रुपये कमी करून तुला देऊन टाकेल.”
महत्वाच्या बातम्या
- PM Kisan Yojana | शेतकऱ्यांसाठी खुशखबर! वाढू शकते पीएम किसान योजनेतील हप्त्याची रक्कम
- Jaydev Unadakar | जयदेव उनाडकरचे 12 वर्षानंतर कसोटी संघात पुनरागमन, मिळाले देशांतर्गत क्रिकेट कामगिरीचे बक्षीस
- Weight Loss Tips | हिवाळ्यामध्ये वाढते वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी करा ‘हे’ सोपे व्यायाम
- Winter Health Care | हिवाळ्यामध्ये तिळाचे तेल खाल्याने मिळतात ‘हे’ आरोग्यदायी फायदे
- IND vs BAN | आजच्या सामन्यामध्ये भारतीय संघासमोर मोठे आव्हान, जपावी लागेल आपली प्रतिष्ठा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

