🕒 1 min read
मुंबई : कालच्या उद्धव ठाकरेंच्या सभेनंतर मनसेकडून शिवसेनेवर जोरदार टीका होत असताना पाहायला मिळत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अखिल चित्रे यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांवर निशाणा धरला आहे. महाराष्ट्रातील महाविकास आघाडीतील नेते सकाळी उठत असले तरी त्यांनी सकाळी उठून काय दिवे लावले? असा सवाल अखिल चित्रे यांनी केला आहे. तसेच यासह संजय राऊत यांच्यावरही त्यांनी निशाणा साधला आहे.
“सजंय राऊत भगव्या उपरण्यानं घाम पुसतात हे यांचं हिंदुत्त्व आहे. महाविकास आघाडीतील नेते शॉर्ट सर्किट आहेत. त्यांच्यामध्ये पक्षांतर्गत लोचा आहे, अशी टीका अखिल चित्रे यांनी केली आहे. तसेच सामनावीर, शिवसेनेचे लाऊडस्पीकर रोज सकाळी बांग देतात. पक्षप्रमुख भाषण करत असताना हे महाशय पाठीमागं बसून भगव्या उपरण्यानं घाम पुसतात हे यांचं हिंदुत्त्व आहे का? असा सवालही यावेळी त्यांनी उपस्थितीत केला.
महाविकास आघाडीतील नेत्यांवर टीका करताना अखिल चित्रे म्हणाले, महाराष्ट्रातील महाविकास आघाडीतील नेते सकाळी उठत असले तरी त्यांनी सकाळी उठून काय दिवे लावले? सध्या काय उद्योग राहिलेला नाही त्यांना, महाराष्ट्रातील नेते सकाळी उठतात की दुपारी उठतात हे पाहायला जातात का? सकाळी उठून काय उद्योग खात्यात काय दिवे लावले? असे म्हणत अखिल चित्रे यांनी शिवसेना नेते उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यावर टीका केली. यासह मनसेचे नवी मुंबईतील नेते गजानन काळे यांनी देखील शिवसेनेवर टीका केली. मुख्यमत्र्यांची सभा ही मास्टर सभा नव्हती तर ती पाठांतर सभा होती. उद्धव ठाकरे यांच्या भाषणात जोश नव्हता, अशी टीका गजानन काळे यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या –

