🕒 1 min read
मुंबई:- भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार असलेल्या ‘भारतरत्न’ने काँग्रेसच्या प्रभारी अध्यक्षा सोनिया गांधी आणि बहुजन समाजवादी पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांचा सन्मान करावा, अशी मागणी काँग्रेस नेते आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री हरीश रावत यांनी केली आहे. राजकारण आणि समाजकारणातील महिला शक्तीचा आदर करत सोनिया गांधी आणि मायावती यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा, असं मत रावत यांनी व्यक्त केलं आहे.
दरम्यान, सोनिया गांधी आणि बहुजन समाज पार्टीच्या अध्यक्षा मायावती यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्याची मागणी केली आहे. मात्र, त्यांच्या याच मागणीवर भाजप नेते अतुल भातखळकर यांनी खोचक टोला लगावला आहे.
जगात भ्रष्टाचाराचे नवे उच्चांक प्रस्थापित करणाऱ्यांसाठी असते का एखादे भारतरत्न?, असा सवाल अतुल भातखळकर यांनी उपस्थित केला आहे.
जगात भ्रष्टाचाराचे नवे उच्चांक प्रस्थापित करणाऱ्यांसाठी असते का एखादे भारतरत्न???https://t.co/Sxm6n28JHp
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) January 6, 2021
महत्वाच्या बातम्या
- राष्ट्रवादीचा शिवसेनेला दणका ; सोलापुरातील हा मातब्बर नेता करणार राष्ट्रवादीत प्रवेश
- अन्य धर्मावर टीका न करता बौद्ध धम्माचा प्रसार करा- रामदास आठवले
- चारचाकी वाहनधारकांनी फास्टटॅग न बसविल्यास दंडात्मक कारवाई; परिवहन अधिकाऱ्यांचा इशारा
- आघाडी सरकारच्या नेत्यांनी आपल्या कृतीतून शेतकरी प्रेम दाखवावे – रावसाहेब दानवे
- ‘लढणारा एकटा असला तरी हुकूमशहाला भय वाटते’ ; शिवसेनेच्या अग्रलेखातून गांधी यांचे कौतुक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
