🕒 1 min read
सोलापूर : राष्ट्रीय महामार्गावर टोल नाक्यावर 1 जानेवारी 2021 पासून टोल वसुलीची प्रक्रिया फास्टटॅगद्वारे सुरू झाली आहे. चारचाकी वाहनधारकांनी तत्काळ फास्टटॅग बसवून घ्यावे, अन्यथा दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय डोळे यांनी सांगितले.
भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण विभागाने प्रवासी वाहतूक करणारी चारचाकी वाहने (एम) आणि मालवाहतूक करणारी चारचाकी वाहने (एन) या संवर्गाच्या वाहनांसाठी फास्टटॅग अनिवार्य केले आहे. टोलनाक्यांवर वाहनांच्या रांगा लागू नयेत, टोलवसुलीची प्रक्रिया सुरळित होण्यासाठी फास्टटॅग महत्वाचे आहे. संबंधित विक्रेते, वाहतूकदार आणि टॅक्सी युनियन यांना याबाबत माहिती देण्यात आली आहे.
वाहन फास्टटॅगशिवाय रस्त्यावर आढळून आल्यास मोटार वाहन कायदा 1988मधील कलम 177 नुसार 200 रूपये दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे डोळे यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या
- राष्ट्रवादीचा शिवसेनेला दणका ; सोलापुरातील हा मातब्बर नेता करणार राष्ट्रवादीत प्रवेश
- अन्य धर्मावर टीका न करता बौद्ध धम्माचा प्रसार करा- रामदास आठवले
- हिटमॅन रोहित शर्माच्या आगमनाने ऑस्ट्रेलियन बॉलर्सना धडकी !
- बिल्डर्सना मोठा दिलासा, प्रीमियममध्ये 50% सवलत देण्याचा प्रस्ताव कॅबिनेटने केला मंजूर
- ‘लढणारा एकटा असला तरी हुकूमशहाला भय वाटते’ ; शिवसेनेच्या अग्रलेखातून गांधी यांचे कौतुक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
