मुंबई : मुंबईसह उपनगरांमध्ये आज पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे, मुंबईतील सखल भागांसह उपनगरांमध्ये देखील अनेक भागांमध्ये सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात पाणी साचले. यामुळे नेहमीची येतो पावसाळा या म्हणीप्रमाणे मुंबईची पुन्हा तुंबई झाल्याचे पाहायला मिळाले. यामुळे लोकल सेवेसह रस्ते वाहतुकीवर देखील मोठ्या प्रमाणात परिणाम झाला असून सामान्य मुंबईकरांना यंदा देखील या समस्येमुळे मनस्ताप सहन करावा लागत आहे.
दरम्यान तब्बल १०४ टक्के नालेसफाई झाल्याचा दावा मुंबई महापालिकेने केला होता. मात्र, मान्सूनच्या पहिल्या दोन दिवसातच या दाव्यावर पाणी फेरले आहे. तर, भाजप नेत्यांनी महापालिकेत सत्तेत असलेल्या शिवसेनेसह राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला आहे.
आता विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सायन सर्कल आणि हिंदमाता परिसरात गुडघ्याभर पाण्यात उतरून परिस्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांनी मुंबईच्या पाणी तुंबण्याला जबाबदार कोण ? असा सवाल केला आहे.
पुन्हा एकदा 'मुंबईची तुंबई झाली',
मुंबईत पाणी भरवून दाखवलं!
मुंबईतील तुंबलेल्या पाण्याला मुख्यमंत्री जबाबदार असतील, असं यापूर्वी @advanilparab म्हणाले होते.
परंतु आत्ता तुंबलेल्या मुंबईला मुख्यमंत्री जबाबदार की @mybmc जबाबदार?
हे त्यांनी सांगावं! pic.twitter.com/lGP3lzcJww— Pravin Darekar – प्रविण दरेकर (@mipravindarekar) June 9, 2021
‘फडणवीस सरकार राज्यात सत्तेत असताना शिवसेना नेते अनिल परब यांनी मुंबईत पाणी तुंबण्याला मुख्यमंत्री जबाबदार असल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे आता मुंबईत पाणी तुंबण्याला जबाबदार कोण ? मुख्यमंत्री कि महापालिका ? हाय-टाइड आणि अति पावसाने पाणी तुंबल्याचं सांगितलं जातंय. मात्र, मुंबईसाठी हे नवीन नाही. प्रकल्प अपूर्ण असल्याने मुंबईकरांना या गैरसोयीला सामोरं जावं लागतंय. त्यामुळे आता तरी तुंबलेल्या पाण्याचा निचरा होईल अशी व्यवस्था तात्काळ महापालिकेने करावी,’ अशी मागणी देखील प्रवीण दरेकर यांनी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- उरवडे दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना तात्काळ मदत पोहोचवा ; मुख्यमंत्र्यांचे निर्देश
- आपल्याला कोणत्याही राजकीय नेत्यांची अॅलर्जी नाही – महादेव जानकर
- … तर वाघाशी दोस्ती करायला आम्ही कधीही तयार; चंद्रकांतदादांनी दिले युतीचे संकेत !
- परभणीच्या पाणी प्रश्नासाठी ६५० कोटींचा आराखडा
- अजितदादांचा मोठा निर्णय,’या’ विभागातील ८ हजार १०४ कर्मचाऱ्यांच्या मानधनात होणार वाढ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

