Share

उरवडे दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना तात्काळ मदत पोहोचवा ; मुख्यमंत्र्यांचे निर्देश

Published On: 

मुंबई : मुळशी तालुक्यातील उरवडे गावाजवळ असलेल्या रासायनिक कंपनीला लागलेल्या आगीत 18 कामगारांचा होरपळून मृत्यू झाला आहे. आगीतील मृत्यूप्रकरणी औद्योगिक सुरक्षा मानकांचा गांभीर्याने आढावा घेण्यात यावा. तसेच दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना जाहीर करण्यात आलेली शासकीय मदत तत्काळ मिळावी यासाठी कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.

उरवडेतील या रासायनिक कंपनीतील दुर्घटनेबाबत चौकशी करण्यासाठी समिती गठित करण्यात आली आहे. या समितीनेही सर्वंकष चौकशीनंतर तातडीने अहवाल सादर करावा. मृतांच्या कुटुंबियांना मदत देण्याबाबतही प्रशासनाने कार्यवाही करून, लवकरात लवकर सबंधितांना आर्थिक सहाय्य उपलब्ध करून द्यावे. औद्योगिक वसाहतीतील रासायनिक कंपन्यांबाबत औद्योगिक सुरक्षा मानकांचा वारंवार आढावा घेण्यात यावा. सुरक्षा उपाययोजनांबाबत, तसेच नियमांबाबत हलगर्जीपणा करणाऱ्या उद्योंगावर कारवाई करण्यात यावी.

सुरक्षा उपाययोजनांतील त्रुटींमुळे जीवितहानी होऊ नये याबाबत कठोरपणे पावले उचलण्यात यावीत, असेही निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. दरम्यान, या दुर्घटनेला कंपनी मालकच जबाबदार असल्याचं सांगत काल एसव्हीएस कंपनीचे मालक निकुंज शहा यांच्याविरोधात पौड पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी या दुर्घटनेची प्राथमिक चौकशी केली. त्यानंतर या दुर्घटनेला कंपनी मालकच जबाबदार असल्यामुळे त्याच्याविरोधात गुन्हा पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या भीषण आगीच्या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. कंपनीचे मालक निकुंज बिपीन शहा, बिपीन जयंतीलाल शहा, केयुर बिपीन शहा यांच्याविरोधात भादवि कलम ३०४(२), २८५, २८६ आणि ३४ नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आज त्याला शिवाजीनगर जिल्हा कोर्टात हजर केलं असता 13 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!