मुंबई : उत्तर प्रदेशातील लखीमपूरमध्ये शेतकऱ्यांना चिरडल्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने आक्रमक पवित्रा घेतला आहे. लखीमपूर हिंसाचार प्रकरणाचा निषेध म्हणून महाविकास आघाडीकडून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. या बंदमध्ये अत्यावश्यक सेवा, रुग्णालये, औषधालये वगळता सर्व आस्थापना बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. महाविकास आघाडी सरकारनं पुकारलेल्या बंदला संमिश्र प्रतिसाद येत आहे. तर दुसरीकडे, महाराष्ट्र सरकारच्या या बंदला भाजपने विरोध दर्शवला आहे.
दरम्यान, महाराष्ट्र बंदवर आता माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अमृता फडणवीस ट्विट करत म्हणाल्या, ‘कोणी मला सांगेल का?, आज वसूली चालू है या बंद?’ असा खोचक सवाल करत त्यांनी महाराष्ट्र बंदला आपला विरोध दर्शवला आहे.
Can anyone update me –
आज वसूली चालू है या बंद ?#MaharashtraBandhNahiHai— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) October 11, 2021
तर दुसरीकडे भाजप प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी याच विषयावर भाष्य करत राज्यसरकारवर टीकास्त्र सोडले आहे. यावेळी त्यांनी ‘राज्यातल्या धोरणांबाबत ढिम्म’ सरकार, दुसऱ्याच्या नावावर राजकारण साधायला पुढाकार’ असलेलं महाराष्ट्र सरकार. बलात्कार अत्याचार घटनांनी रोज महाराष्ट्र हादरून जातोय,अतिवृष्टीने शेतकरी बेजार झालाय. महाराष्ट्र सरकार मात्र हफ्तावसुली करण्यात मग्न…कुछ तो शर्म करो… #NoMaharashtraBandh असं म्हणत वाघ यांनी शरसंधान केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘सरकारचा या बंदशी सूतराम संबंध नाही, भाजपच्या कृत्याचा निषेध म्हणून जनताच उत्स्फूर्तपणे सहभागी झाली’
- ‘उद्धव ठाकरेंमध्येही अलीकडे राहुल गांधींची झलक दिसू लागली आहे’, भाजपचा टोला
- ‘महाराष्ट्र बंद’ दरम्यान राज्यभरातील एसटी सेवा सुरू राहणार, महामंडळाचा निर्णय
- भाजपला सत्तेची मस्ती आहे बाकी काही नाही; खासदार सुप्रिया सुळे यांची घणाघाती टीका
- ‘नागरिकांनी घाबरून न जाता कुणी दबाव टाकत असेल तर भाजपाच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधावा’


