Share

‘मुळात महान लोकांची नावे विमानतळाला देण्याची गरजच काय?’ ; केदार शिंदेंचा सवाल

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : अभिनेता आणि दिग्दर्शक केदार शिंदे हे नेहमीच आपल्या स्पष्टवक्तेपणा आणि निर्भिड वक्तव्यांसाठी प्रसिद्ध आहेत. अनेक घडामोडींवर केदार आपल्या मार्मिक शैलीमध्ये मत व्यक्त करत असतात. सध्या नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव द्यावे या मागणीने जोर पकडला आहे. रिपाईसोबतच अनेक समाजिक संघटना ही मागणी करताना दिसून येत आहेत. लोकनेते दि. बा.पाटील यांचे नाव विमानतळाला देण्यासाठी यापूर्वी राज्य आणि केंद्र सरकारकडे विनंती करण्यात आलेली आहे. तरी देखील अचानकपणे 17 एप्रिल रोजी सिडकोच्या संचालक मंडळाने लोकभावनेचा विचार न करता शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे.

याच वादात आता केदार शिंदे यांनीही ट्विटरवर आपली उडी घेतली आहे. ‘मुळात महान लोकांची नावं, रेल्वे स्टेशन/विमानतळ/ बसस्थानक/ पूल इत्यादी ठिकाणी देण्याची गरजच काय? नंतर जेव्हा कोणी त्याचा short form करून त्याची पत घालवतो तेव्हा ते क्लेशदायक होतं… ‘मी CST हून ट्रेन पकडली’… काय राहीला छत्रपती शिवाजी महाराजांचा मानसन्मान??’ अशा आशयाचे ट्वीट करून त्यांनी अनेकांना फटकारलेच आहे.

दरम्यान, नवी मुंबईतील या विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा हा निर्णय झाल्यानंतर जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्त शेतकरी, कष्टकरी ओबीसी जनतेत प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. सामाजिक कार्यासाठी आपले आयुष्य वाहून घेणाऱ्या या लोकनेत्याचे नाव विमानतळाला द्यावे यासाठी सारे प्रकल्पग्रस्त तसेच सामाजिक व राजकीय संघटना मानवी साखळी आंदोलन केले होते. यामुळे आता किमान केदार शिंदे यांचे हे मत जाणून घेवून त्याचा विचार करून जनसामान्य तरी यातून काही धडा घेणार का हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!