Share

नगर गुन्हेगारीत उत्तर प्रदेश होतेय का ? रामदास कदम यांचे गृहमंत्रालयावर ताशेरे

Published On: 

अहमदनगर: नगर जिल्ह्यात गुन्हेगारीने चांगलेच तोंड वर काढले आहे. नगर जिल्ह्यातील केडगावमध्ये शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या हत्या करण्यात आली. त्यामुळे नगर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा पुर्णपणे बोजवारा उडाला आहे. दरम्यान, नगर गुन्हेगारीत उत्तर प्रदेश होतेय का ?  असे बोलत पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी गृहमंत्रालयावर ताशेरे ओढले. गुन्हेगारांना फाशी द्यावी आणि गुन्हेगारांवर पोलीसांनी मोक्काअंतर्गत गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी कदम यांनी केली आहे.

घटनेच्या पार्श्वभुमीवर रामदास कदम अहमदनगरमध्ये शासकिय विश्रामगृहावरील पत्रकार परिषदेत बोलत होते. कदम म्हणाले, डीवायएसपी अक्षय शिंदे, कोतवालीचे निरीक्षक अभय परमार यांच्या संगनमताने हे हत्याकांड झाले आहे. त्यामुळे प्रथम या दोन्ही पोलीस अधिका-यांची हकालपट्टी करावी. केडगावातील दहशतीबाबत पोलीसांना कल्पना देऊन त्यांनी गांभीर्यान घेतले नाही. पोलीसांच्या संगणमताने हे प्रकरण घडले आहे. असा गंभीर आरोप रामदास कदम यांनी केला आहे.

हत्या झालेल्या शिवसैनिकांची जबाबदारी सेना घेईल त्यांना सर्व मदत करेल. शिवसेना कुठल्याही परिस्थितीत या गुन्हेगारांना मोकळे सोडणार नाही. उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार असून त्यांच्याकडे योग्य ती मागणी करणार आहे. कर्डिले, कोतकर आणि जगताप हे एकमेकांचे नातेवाईक आहेत. असे कदम यांनी स्पष्ट केले.

केडगावची पोटनिवडणुकीत भाजप, राष्ट्रवादी आणि कॉग्रेसने एकत्र येत सेनेला शह दिला. भाजपाने नावाला उमेदवार उभा केला. भाजपाने नावापुरता उमेदवार उभा केला. हे सर्व प्रकरण संघटितपणे केले असून गुन्हेगारांवर मोक्काअंतर्गत कारवाई करण्याची मागणी कदम यांनी केली.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!