Share

IRE vs IND : पॉवरप्लेमध्ये भुवी सुपरहिट..! भुवनेश्वर कुमारच्या नावावर नव्या रेकॉर्डची नोंद

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : भारतीय संघाचा ३२ वर्षीय अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार आयर्लंडविरुद्धच्या (IRE vs IND) मालिकेतील पहिल्या टी-२० सामन्यात जबरदस्त फॉर्ममध्ये दिसला. पहिल्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर त्याने संघासाठी गोलंदाजीची सलामी देत ​​पहिला ब्रेकथ्रू मिळवला. विरोधी संघाचा कर्णधार अँड्र्यू बालबर्नीला भुवनेश्वरने बाद केले. यासोबतच भुवनेश्वरने मोठा विक्रम केला.

टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या पहिल्या पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा भुवनेश्वर कुमार पहिला गोलंदाज ठरला आहे. याआधी तो किवी वेगवान गोलंदाज टिम साऊदी आणि माजी कॅरेबियन फिरकीपटू सॅम्युअल बद्री यांच्यासोबत संयुक्तपणे प्रथम स्थानावर होता.

टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या पहिल्या पॉवरप्लेमध्ये साऊदी आणि बद्री यांनी अनुक्रमे ३३-३३ विकेट घेतल्या आहेत. त्याचबरोबर भुवनेश्वर कुमारच्या नावावर ३४ विकेट्स आहेत. या तीन खेळाडूंनंतर बांगलादेशचा स्टार अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसन चौथ्या स्थानावर आणि ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड पाचव्या स्थानावर आहे. टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या पहिल्या पॉवरप्लेमध्ये हसनने २७ आणि हेझलवूडने २६ विकेट्स घेतल्या आहेत.

भुवनेश्वर कुमारने भारतीय संघासाठी ६४ सामने खेळले आहेत आणि ६३ डावांमध्ये ६४ बळी घेतले आहेत. टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याने दोनदा चार आणि एकदा पाच विकेट घेण्याचा पराक्रम केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!