Share

IPL Mega Auction 2022 : पंजाब किंग्जला धक्का, प्रीती झिंटाने IPL मेगा लिलावातून घेतली माघार

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : पंजाब किंग्जची सह-मालक बॉलीवूड अभिनेत्री प्रीती झिंटा IPL 2022 मेगा ऑक्शनमधून बाहेर पडली आहे. प्रीती नुकतीच आई झाली आहे, कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर ती मुलांना सोडून भारतात येऊ शकत नाही. या अभिनेत्रीने सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली. आयपीएल २०२१ मेगा लिलाव १२ ते १३ फेब्रुवारी दरम्यान बंगळुरू येथे होणार आहे. यावेळी ८ ऐवजी १० संघ लिलावात सहभागी होणार आहेत.

४७ वर्षीय प्रीती झिंटाने लिलावाच्या एक दिवस आधी आज (शुक्रवार) तिच्या अधिकृत ट्विटर हँडलवर स्वतःचा एक फोटो अपलोड केला आणि ट्विट केले की, “मी यावेळी आयपीएल लिलाव २०२२ मध्ये भाग घेऊ शकणार नाही. मी माझ्या लहान मुलाला सोडून भारतात येऊ शकत नाही. गेल्या काही दिवसांपासून मी आणि माझी टीम लिलाव आणि क्रिकेटच्या सर्व गोष्टींवर एकत्र चर्चा करण्यात व्यस्त होतो. मला माझ्या चाहत्यांना विचारायचे आहे की त्यांच्याकडे आमच्या संघासाठी काही खेळाडू सूचना आहेत का?.”

यापूर्वी संघाचे फलंदाजी प्रशिक्षक वसीम जाफर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. एका मजेदार मीमच्या माध्यमातून त्याने ट्विटरवर ही माहिती शेअर केली आहे. वसीम २०१९ मध्ये फलंदाजी प्रशिक्षक म्हणून संघाशी जोडला गेला होता.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!