पुणे : संजय राऊत आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पुण्यात जम्बो कोविड रुग्णालयात घोटाळा केला आहे असा आरोप भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार आणि ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. या निमित्त किरीट सोमय्या पुणे पोलिसांमध्ये तक्रार नोंदवण्यासाठी आले असता शनिवार दिनांक ५ फेब्रुवारी रोजी त्यांच्यावर पुणे महानगरपालिका भवनात पुण्यातील शिवसैनिकांकडून जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. या शिवसैनीकांनी केलेल्या हल्य्यामुळे किरीट सोमय्या यांना पुणे महानगरपालिका भवनात किरकोळ जखमही झाली होती आणि या सर्व प्रकरणावर राज्यभरात भारतीय जनता पक्षाकडून तीव्र निषेध नोंदवण्यात आला होता.
किरीट सोमय्या यांचा आज पुणे महानगरपालिका भवनात पुणे शहर भारतीय जनता पक्षातर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी पुणे शहरातील असंख्य भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आणि बडे नेते जमा झाले होते. यावेळी सविस्तर बोलताना किरीट सोमय्या यांनी पुणे शहराचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ”पुणे शहराचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता हे पोलीस आयुक्त नसून ठाकरे-पवारांचे एजंट असल्यासारखे वागतात. पीएमसी बँकेचे सहा हजार 400 कोटी रुपये लाटणाऱ्या राकेश वाधवान यांना ते वॉन्टेड असताना पळवलं होतं. शनिवारी मी जेव्हा महापालिका आयुक्तांना भेटण्यासाठी आलो होतो तेव्हा या ठिकाणी पुणे पोलिसांचा एकही कर्मचारी नव्हता. तेव्हा सर्व पोलीस अमिताभ गुप्ता यांनी गायब केले होते.
माझ्यावर ज्या शिवसैनिकांनी जीवघेणा हल्ला केला त्या शिवसैनिकांवर शेजारी उभे असणाऱ्या पुणे पोलिसांनी किरकोळ गुन्हे दाखल केले आहेत, खरं तर या हल्लेखोरांवर हत्येचा गुन्हा दाखल करायला हवा होता मात्र पुणे पोलिसांनी असे न करता त्यांच्यावर किरकोळ गुन्हे दाखल केले आहेत त्यामुळे पुणे शहराचे पोलीस आयुक्त हे ठाकरे- पवार सरकारचे एजंट आहेत याची मला खात्री आहे.
महत्वाच्या बातम्या :
- “…तर महाविकास आघाडीच्या प्रत्येक आमदाराची चौकशी लावली असती”; रामदास आठवले
- VIDEO: कोर्टाने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावल्यानंर बच्चू कडूंची पहिली प्रतिक्रिया
- ‘कधीकधी वाटतं डावा हात कापून टाकावा”, केन विल्यमसननं असं का म्हटलं? नक्की वाचा!
- पुणे महानगरपालिकेत किरीट सोमय्यांचा सत्कार; भाजपचे शक्ति प्रदर्शन
- न्यायालयाच्या निकालानंतर बच्चू कडू यांची पहिली प्रतिक्रिया

