🕒 1 min read
युएई : युएईमधील देशात आयपीएलचे १३वे सत्र पार पडत असून आता हे सत्र अंतिम टप्प्यात येऊन पोहोचले आहे. कोरोनाच्या वातावरणातून आयपीएलने नवा उत्साह निर्माण केला होता. यावर्षी देखील प्ले-ऑफ गाठण्यासाठी संघांना चांगलाच सामना करावा लागला. आज आयपीएलचा अखेरचा सामना पार पडणार आहे.
साखळी सामन्यात टॉपवर राहणाऱ्या मुंबई इंडियन्सने क्वालिफायर-१ च्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सला धूळ चारत थेट अंतिम सामन्यात धडक मारली. तर, एलिमिनेटर सामन्यात आरसीबीचा पराभव करून क्वालिफायर-२ सामन्यात सनराईझर्स हैद्राबादने प्रवेश केला होता. या सामन्यात दिल्ली आणि हैद्राबादमध्ये अंतिम सामान्याचं तिकीट मिळवण्यासाठी रंगतदार लढत झाली. मात्र, दिल्ली हैद्राबादवर सरस ठरली आणि आयपीएलच्या १३ व्या सत्राचा अंतिम सामना गाठून पहिल्यांदाच आयपीएलच्या विजेतेपदासाथीच्या लढतीपर्यंत मजल मारली.
यंदा चॅम्पियन कोण ठरणार याची उत्सुकता शिगेला गेली असतानाच दिल्लीसोबतच्या क्वालिफायर-१ नंतरच्या सामन्यावेळी मुंबईची काहीशी डोकेदुखी वाढली होती. याचं कारण होत भेदक गोलंदाज ट्रेंट बोल्ट. या सत्रात ट्रेंट बोल्टला चांगला सूर गवसला आहे. दिल्लीसोबतच्या सामन्यात बोल्ट जखमी झाला आणि त्याला त्याच्या कोट्यातील षटके देखील पूर्ण करता आली नाहीत.
त्यामुळे, ट्रेंट बोल्ट अनफिट राहिल्यास दिल्लीच्या आव्हानासमोर मुंबईची गोलंदाजी कमी पडणार असा चर्चांना उधाण आलं होतं. मात्र, काल कर्णधार रोहित शर्माने पत्रकारांशी साधलेल्या संवादात ट्रेंट बोल्ट विषयी देखील महत्वाचं भाष्य केलं आहे. “बोल्ट बरा आहे. त्याने आमच्यासोबत सराव देखील केला. बघू आता त्याच्याबद्दल काय होतंय. तो खेळेल अशीच अपेक्षा आहे.” असं तो म्हणाल्यामुळे मुंबई इंडियन्सच्या फॅन्ससाठी ही महत्वाची बाब आहे.
महत्वाच्या बातम्या
- उत्तर प्रदेशात योगींचीच हवा; पोटनिवडणुकीत विरोधकांचा सुपडा साफ होण्याची चिन्हे
- बिहारचा रणसंग्राम : महागठबंधन-एनडीएने जोरदार चुरस
- बिहार विधानसभा निवडणुकीत NDAने केली शंभरी पार
- #Bihar : महागठबंधन-एनडीएमध्ये कांटे की टक्कर; चिराग पासवान ठरणार किंगमेकर ?
- कृषी विद्यापीठांमधील कर्मचाऱ्यांचे आंदोलन; प्राजक्त तनपुरेंनी घेतली आंदोलकांची भेट!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
