🕒 1 min read
बंगळूरू: IPL 2022 च्या मेगा ऑक्शनमध्ये सनरायझर्स हैदराबादने एकूण २० खेळाडूंना खरेदी केले आहे. वॉशिंग्टन सुंदर, निकोलस पूरन, टी नटराजन आणि भुवनेश्वर कुमार हे काही लोकप्रिय खेळाडू आहेत, ज्यांना संघाने विकत घेतलेले आहे. निकोलस पूरन हा संघातील सर्वाधिक महागडा खेळाडू ठरला आहे. त्याला हैदराबादने १०. ७५ कोटीमध्ये विकत घेतले आहे.
मेगा ऑक्शनपूर्वी सनरायझर्स हैदराबादकडे ६८ कोटी रुपये शिल्लक होते. IPL 2022 च्या ऑक्शनपूर्वी हैदराबादने ३ खेळाडूंना रिटेन करण्यासाठी ९० मधील २२ कोटी खर्च केले. त्यांनी केन विल्यमसनला १४ कोटी, आणि अब्दुल समद आणि उमरान मलिक यांना प्रत्येकी ४ कोटीमध्ये रिटेन केले होते.आयपीएल २०१३ च्या हंगामात सनरायझर्स हैदराबादने आयपीएलमध्ये प्रवेश केला होता. IPL 2016 चे पहिले जेतेपद त्यांनी मिळवले होते. IPL 2018 मध्येही हैद्राबाद संघ उपविजेता ठरला होता. आतापर्यंत ९ हंगामांपैकी हैद्रबाद ६ वेळा प्लेऑफमध्ये पोहोचला आहे. हैद्राबाद पुन्हा नवीन संघासोबत स्पर्धेत उतरणार आहे.
सनरायझर्स हैद्राबादचा संघ पुढीलप्रमाणे : केन विल्यमसन, अब्दुल समद, उमरान मलिक, वॉशिंग्टन सुंदर, निकोलस पूरन, टी नटराजन, भुवनेश्वर कुमार, प्रियम गर्ग, राहुल त्रिपाठी, अभिषेक शर्मा, कार्तिक त्यागी, श्रेयस गोपाल, जे सुचिथ, एडन मार्कराम, मार्को जॅनसेन, रोमॅरियो शेफर्ड, आर समर्थ , शशांक सिंग, सौरभ दुबे, विष्णू विनोद, ग्लेन फिलिप्स, फजलहक फारुकी.
महत्वाच्या बातम्या
- “गजवा-ए-हिंदचे स्वप्न पाहणाऱ्यांचे…”, योगी आदित्यनाथांचे मोठे वक्तव्य
- IPL AUCTION 2022: बँगलोरचा ‘रॉयल’ संघ प्रतिस्पर्धीना चॅलेंज देणार
- “काही दिवसांत भाजपचे साडे तीन लोक अनिल देशमुखांच्या कोठडीत असतील”, संजय राऊतांचा मोठा दावा
- IPL AUCTION 2022: मेगा ऑक्शननंतर अशी आहे रोहित शर्माची ‘पलटन’
- पाटलांच्या वक्तव्यावर माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याने बोलणे योग्य नाही- अजित पवार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
