🕒 1 min read
बंगळूरू: IPL 2022 मेगा ऑक्शनमध्ये कोलकाता नाईट रायडर्सने २१ खेळाडूंना खरेदी केले. ज्यात श्रेयस अय्यर, पॅट कमिन्स, नितीश राणा आणि शिवम मावी हे काही प्रमुख खेळाडू ठरले. मागच्या वर्षी कर्णधार असलेल्या इयॉन मॉर्गनला त्यांनी संघात परत घेतले नाही.तसेच मॉर्गन ऑक्शन मध्येही अनसोल्ड राहिला आहे. श्रेयस अय्यर कोलकताने खरेदी केलेला सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. कोलकाताने श्रेयसला १२.२५ कोटीत खरेदी केले.
आयपीएल २०२२ मेगा ऑक्शनसाठी कोलकाता नाइट रायडर्सकडे ४८ कोटी रुपये होते. संघाने आधीच ४२ कोटी रिटेंशनसाठी वापरले होते. त्यांनी आंद्रे रसेलला १२ कोटीत , वरुण चक्रवर्ती ८ कोटीत, व्यंकटेश अय्यर ८ कोटीत आणि सुनील नरेनला ६ कोटीत रिटेन केले होते.I PL 2021 मध्ये कोलकताने धमाकेदार कामगिरी केली होती..पहिल्या लेगनंतर पॉइंट्स टेबलमध्ये पिछाडीवर असलेल्या संघाला इयॉन मॉर्गनच्या नेतृत्वात संघाने पुनरागमन करत प्लेऑफमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर अंतिम फेरी देखील गाठली होती. यंदा मात्र त्यांनी कर्णधार मॉर्गनला संघात घेतले नाही. त्यामुळे श्रेयस अय्यरकडे कर्णधार म्हणू बघितले जात आहे.
कोलकाता नाईट रायडर्सचा संघ : आंद्रे रसेल, वरुण चक्रवर्ती, व्यंकटेश अय्यर, सुनील नारायण, श्रेयस अय्यर, पॅट कमिन्स, नितीश राणा, शिवम मावी, शेल्डन जॅक्सन, अजिंक्य रहाणे, रिंकू सिंग, अनुकुल रॉय, रसिक दार, चमिका करुणारत्ने, बाबा इंद्रजीत, रिले मेरिथ सिंग, बाबा इंद्रजीत. , अभिजीत तोमर, सॅम बिलिंग्ज, अॅलेक्स हेल्स, रमेश कुमार, मोहम्मद नबी, अमन खान, उमेश यादव.
महत्वाच्या बातम्या
- उदयनराजे नेहमीच स्टंटबाजी करून सातारकरांना खोटी स्वप्न दाखवतात ; शिवेंद्रराजेंची खोचक टीका
- ‘स्टंटबाजी करून विकासाची खोटी स्वप्ने दाखवतात’; शिवेंद्रराजे भोसले यांचा उदयनराजेंवर निशाणा
- “…तर काही भाजप नेत्यांनी राष्ट्रपती राजवटीसाठी राजभवनावर मुक्कामच ठोकला असता”, रोहित पवारांचे खोचक ट्वीट
- IPL AUCTION 2022: दिल्लीची ‘नवीन टोली’ स्पर्धा करणार काबीज
- “ते साडेतीन शहाणे कोण? हे मला माहित आहे पण…”, नाना पटोलेंचे सूचक वक्तव्य
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
