मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी ड्रग्जच्या मुद्यावरून भाजपला निशाण्यावर धरले आहे. गुजरातमध्ये सप्टेंबर, नोव्हेंबर आणि जानेवारी महिन्यात गुजरातमध्ये सापडलेल्या ड्रग्जचा हवाला देत त्यांनी भाजप नेत्यांवर टीका केली आहे.
“गुजरातमध्ये सप्टेंबर महिन्यात २१ हजार कोटी, नोव्हेंबर महिन्यात ५०० कोटी आणि जानेवारी २०२२ मध्ये २ हजार कोटी ड्रग्ज सापडले. यातलं १ टक्के ड्रग्स जरी महाराष्ट्रात सापडलं असतं तर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा, या मागणीसाठी राज्यातल्या काही भाजप नेत्यांनी तर राजभवनावर मुक्कामच ठोकला असता.”, असे ट्वीट करत रोहित पवार यांनी भाजपवर टीका केली आहे.
सप्टेंबर २०२१-२१ हजार कोटी
नोव्हेंबर २०२१-५०० कोटी
जानेवारी २०२२-२ हजार कोटी
(गुजरातमध्ये सापडलेलं ड्रग्स)यातलं १ % ड्रग्स जरी महाराष्ट्रात सापडलं असतं तर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा,या मागणीसाठी राज्यातल्या काही भाजप नेत्यांनी तर राजभवनावर मुक्कामच ठोकला असता.#drugs_hub
— Rohit Pawar (@RRPSpeaks) February 14, 2022
तसेच केवळ बिगर भाजपशासित राज्यात थोडं जरी ड्रग्स सापडलं तरी आकांडतांडव करणाऱ्या भाजपच्या नेत्यांनी भाजपशासित राज्यात सापडणाऱ्या हजारो कोटी रुपयाच्या ड्रग्सवरही बोललं पाहिजे. कारण युवांच्या सुरक्षित भवितव्यासाठी ड्रग्स या विषयाकडं राजकारणापलीकडं जाऊन पाहण्याची गरज आहे. असेही रोहित पवार यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- “नाना पटोले नौटंकीबाज, …कॉंग्रेसनेच माफी मागावी”, देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया
- IPL AUCTION 2022: पंजाब किंग्सचा संघ करणार नव्याने सुरुवात!
- “शिवसेनेत सूड उगवण्याची नीच प्रवृत्ती…”अतुल भातखळकरांचे टीकास्त्र
- ‘भाजपचे साडेतीन लोक अनिल देशमुखांच्याच कोठडीत असतील’-संजय राऊत
- “…याला म्हणतात हात दाखवून अवलक्षण”, भातखळकरांचा हल्लाबोल


