🕒 1 min read
बंगळूरू: इंडियन प्रीमियर लीगच्या मेगा लिलावात इंग्लंडचा फलंदाज जेसन रॉयला गुजरात टायटन्सने २ कोटींमध्ये विकत घेतले (Jason Roy was bought by Gujarat Titans for Rs 2 crore) आहे. यापूर्वी तो दिल्ली कॅपिटल्सकडून खेळला होता. रॉयने गुजरात लायन्ससाठी आयपीएल २०१७ मध्ये फार कमी सामने खेळले. २०१८ मध्ये तो दिल्ली कॅपिटल्सकडून खेळला.
तर २०२१ च्या हंगामात मिचेल मार्शच्या जागी सनरायझर्स हैदराबादने त्याला घेतले. जेसन रॉयने आयपीएलमध्ये केवळ १३ सामने खेळले असून ३२९ धावा केल्या आहेत. स्पर्धेत त्याची सरासरी २९.९१ आहे आणि त्याने १२९.०२ चा स्ट्राईक रेट राखला आहे.
दरम्यान गुजरात टायटन्सने लिलाव सुरू होण्यापूर्वी तीन खेळाडूंना आपल्या संघात स्थान दिले. टायटन्सची पहिली निवड भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या हा होता. हार्दिक पंड्या गुजरात टायटन्सचे कर्णधार पद सांभाळणार आहे. तर अफगाण फिरकीपटू राशिद खानला गुजरात टायटन्स १५ कोटींत खरेदी केले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- IPL Auction 2022: राणाची नाईटरायडर म्हणून कोलकत्यात वापसी
- किरीट सोमय्यांच्या आरोपांवर अजित पवारांचे प्रत्युत्तर, म्हणाले…
- माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर धाडसत्र सुरूच; नागपुरात सीएची चौकशी
- IPL Auction 2022 : मोठी बोली सुरु असतानाच ऑक्शनर बोलता बोलता खाली कोसळले
- चंद्रभागेचे पाणी आरोग्यास धोकादायक; भूजल सर्वेक्षण विभागाने दिली माहिती
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
