मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022) मधील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा (RCB) माजी कर्णधार विराट कोहलीने सध्याचा कर्णधार फाफ डु प्लेसिससोबतच्या त्याच्या संबंधांवर प्रतिक्रिया दिली आहे. कोहली म्हणाला, की तो डू प्लेसिसचा आदर करतो आणि तो अनेक वेळा त्याने दिलेल्या सल्ल्याचे पालन करत नाही. आयपीएल २०२१ संपल्यानंतर विराट कोहलीने आरसीबीचे कर्णधारपद सोडले. यानंतर फ्रेंचायझीने मेगा लिलावात फाफ डु प्लेसिसला विकत घेत संघाची कमान त्याच्याकडे सोपवली. चालू हंगामात, बंगळुरू १२ सामन्यांतून १४ गुणांसह चौथ्या स्थानावर आहे आणि संघ प्लेऑफच्या जवळ आहे.
फाफने आयपीएल २०२२मध्ये कर्णधार म्हणूनही उत्तम कामगिरी केली आहे आणि बॅटनेही आपल्या संघासाठी सर्वाधिक योगदान दिले आहे. त्याने १२ सामन्यात ३७९ धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याचा स्ट्राइक रेट १३२.७६ राहिला आहे.
Interview of the year! Catch Virat Kohli in a relaxed, honest and fun avatar, even as Mr. Nags tries to annoy him just like he’s done over the years. ????????
Tell us what the best moment from this interview was for you, in the comments section. ????????#PlayBold #IPL2022 #RCB #ನಮ್ಮRCB pic.twitter.com/vV6MyRDyRt
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) May 11, 2022
विराट कोहली आरसीबी इनसाइडरवर सादरकर्ता दानिश सैतशी झालेल्या संभाषणात म्हणाला, ”दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार होता त्यापासून फाफ (डु प्लेसिस) आणि मी नेहमीच चांगले मित्र आहोत. फाफ म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवणारी आणि मैदानावर पूर्ण अधिकार असणारी व्यक्ती. तो कधीकधी मी दिलेल्या सल्ल्याला नकार देतो, ज्याचा मी खूप आदर करतो.”
विराट कोहलीने असेही संकेत दिले, की आरसीबीकडून खेळलेला एबी डिव्हिलियर्स पुढील वर्षी फ्रेंचायझीसोबत काही भूमिकेत दिसू शकतो. फ्रेंचायझीचा महत्त्वाचा भाग असलेल्या डिव्हिलियर्सने गेल्या वर्षी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. ”मला त्याची खूप आठवण येते. मी त्याच्याशी नियमित बोलतो. तो नुकताच अमेरिकेत आपल्या कुटुंबासह गोल्फचा आनंद घेत होता. तो आरसीबीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे आणि पुढील वर्षी कोणत्या ना कोणत्या स्वरूपात तो येथे येण्याची अपेक्षा आहे.”
महत्त्वाच्या बातम्या –
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

