मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022)चा ५८वा सामना राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स (RR vs DC) यांच्यात खेळवला जात आहे. डी. वाय. पाटील स्टेडियमवर रंगणाऱ्या या सामन्यात दिल्लीचा कप्तान ऋषभ पंतने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. फलंदाजीत बढती मिळालेल्या रवीचंद्रन अश्विनच्या अर्धशतकाच्या जोरावर राजस्थानने दिल्लीला १६१ धावांचे आव्हान दिले आहे. अश्विनसोबत देवदत्त पडिक्कलने ४८ धावा केल्या.
राजस्थानचा डाव
ऑरेंज कॅपधारी जोस बटलरला (७) दिल्लीचा वेगवान गोलंदाज चेतन साकारियाने स्वस्तात बाद केले. संघाच्या अर्धशतकानंतर दुसरा सलामीवीर यशस्वी जयस्वालही (१९) बाद झाला. त्यानंतर वरच्या फळीत बढती मिळालेल्या रवीचंद्रन अश्विनने देवदत्त पडिक्कलसोबत संघाला शतकी पल्ला गाठून दिला. १४व्या षटकात अश्विनने आपले टी-२० कारकिर्दीतील पहिले अर्धशतक पूर्ण केले. पुढच्याच षटकात मिचेल मार्शने अश्विनला झेलबाद केले. अश्विनने ४ चौकार आणि २ षटकारांसह ५० धावा केल्या. एनरिक नॉर्कियाने १७व्या षटकात संजू सॅमसनला (६) बाद करत राजस्थानला मोठा धक्का दिला. १९व्या षटकात नॉर्कियाने पडिक्कलला बाद करत त्याचे अर्धशतक हुकवले. पडिक्कलने ६ चौकार आणि २ षटकारांसह ४८ धावा केल्या. शेवटच्या दोन षटकात राजस्थानला मोठी फटकेबाजी करता आली नाही. २० षटकात राजस्थानने ६ बाद १६० धावा केल्या. दिल्लीकडून साकारिया, नॉर्किया आणि मार्शने प्रत्येकी २ बळी घेतले.
DDP's ???? + Ash's ????♂️ = 160 to defend.#RoyalsFamily | #HallaBol | #RRvDC
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) May 11, 2022
दोन्ही संघांची Playing 11
राजस्थान रॉयल्स – यशस्वी जयस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन(यष्टीरक्षक/कप्तान), देवदत्त पडिक्कल, रासी व्हॅन डर ड्युसेन, रियान पराग, रवीचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, प्रसिध कृष्णा, युझवेंद्र चहल, कुलदीप सेन.
दिल्ली कॅपिटल्स – डेव्हिड वॉर्नर, श्रीकर भरत, मिचेल मार्श, ऋषभ पंत (यष्टीरक्षक/कप्तान), ललित यादव, रोवमन पॉवेल, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, चेतन साकारिया, कुलदीप यादव, एनरिक नॉर्किया.
महत्त्वाच्या बातम्या –
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

