Share

धनंजय मुंडे पाच-सहा मुलांचे वडील; करुणा मुंडेंचा खळबळजनक आरोप

Published On: 

🕒 1 min read

सोलापूर: राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay munde) यांच्या पत्नी करूणा मुंडे (Karuna munde) यांनी एक धक्कादायक खुलासा केला आहे. धनंजय मुंडे पाच ते सहा मुलांचे वडील आहे. तरी अद्यापही ते मंत्रीपदावर कायम आहेत. असा खळबळजनक दावा करुणा मुंडे यांनी केला आहे.

करुणा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यातील वाद सर्वांनाच परिचित आहे. मात्र यावेळी करुणा मुंडे यांनी केलेला आरोप धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ करण्याची शक्यता आहे. दरम्यान करूणा मुंडे यांनी कोल्हापूर पोटनिवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभुमीवर त्यांनी पंढरपुर येथे विठ्ठल दर्शन घेतले. यावेळी त्यांनी हा धक्कादायक खुलासा केला आहे.

तसेच त्यांनी धनंजय मुंडे आणि माझ्यावर एखादा सिनेमा बनवला तर तो सुपरहिट ठरेल सोबतच महाराष्ट्रातील राजकारणच समोर येईल,असे म्हणत सिनेमा काढण्यासाठी दिग्दर्शकांची लाईन लागली असल्याचा दावाही करूणा मुंडेंनी केला आहे. सोबतच २०२४  मध्ये आपण परळीमधून धनंजय मुंडे यांच्याविरोधात निवडणूक लढवणार असल्याची घोषणाही त्यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!