मुंबई : रणबीर आणि आलिया फिल्म इंडस्ट्रीचे हाॅट कपल म्हणून ओळखले जातं. अनेक कार्यकर्मात या दोघांनी एकत्रित हजेरी लावतात.मागील अनेक दिवसांपासून रणबीर कपूर आणि आलिया भट यांच्या लग्नाची चर्चा सुरू आहे.
लहानपणापासून मित्र असलेले रणबीर आलिया एकमेकांच्या प्रेमात पडले आणि नंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. रणबीर आलियाच्या लग्नाच्या तारखा सध्या सोशल मीडियावर फिरत आहेत. त्यावर आता रणबीरने एका मुलाखतीत लग्नाच्या चर्चेवर मोठं वक्तव्य केलं आहे. मला वेड्या कुत्र्याने चावा घेतला नाही की मी मीडियाला तारीख जाहीर करावी, असं रणबीर म्हणाला आहे.
मी हे नक्की सांगू शकतो, की मी आणि आलिया दोघेही लग्नाच्या बंधनात अडकणार आहोत. आशा आहे की ते लवकरच होईल, असं रणबीर म्हणाला आहे. या मुलाखतीत रणबीरने तारीख सांगण्यास देखील नकार दिला आहे. त्याचबरोबर दोघांच्या घरच्यांनी देखील गप्प बसणं पसंत केलं आहे. त्यामुळे आता चाहत्यांची उत्सुकता देखील वाढली आहे.
महत्वाच्या बातम्या :


